एक्स्प्लोर

हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही.'

मुंबई : "हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही," अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली. शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांशी ऑनलाईन मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मनसेकडून शिवसेनेला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. भोंग्यांवर पहिला आक्षेप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 

"विरोधकांना कळलं पाहिजे की, शिवसेना म्हणजे काय आणि शिवसेनेची ताकद काय असते. ह्यांना मराठीबद्दल प्रेम नाही, हिंदुत्वाबद्दल प्रेम नाही, फक्त स्वतःवर प्रेम आहे. हे आपल्या कर्माने मरणार आहेत, बाकी काही करायची गरज नाही," असं उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मी उभा आहे, यापुढेही राहिन : उद्धव ठाकरे
"शिवसेनेच्या कामात सातत्य ठेवा. आपल्या कार्यकर्त्याला रोजगार मिळतो आहे का ते पाहा. आपल्या कार्यकर्त्याच्या उदरनिर्वाहाकडे लक्ष द्या. शिवसेनेचा भगवा घराघरांत पोहोचवा. तुम्हा सर्व शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मी उभा आहे आणि यापुढेही उभा राहिन," अशा विश्वास देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिला.

हिंदुत्वावर बोलायची आमची लायकी नाही तर तुम्ही पण बोलत नाही : संदीप देशपांडे
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे. "उद्धव ठाकरे काय बोलताय त्यांचं कळतं नाही. उठसूठ मनसेवर बोलायला शिवसेनेला काय झालं कळेना.आता हिंदुत्वावर बोलायची आमची लायकी नाही तर तुम्ही पण बोलत नाही. एनसीपीसोबत जाऊन नवे पुरोगामीत्व तुम्ही स्वीकारलं आहे. भोंगा हा मुद्दा बाळासाहेबांचा आहे मान्य तर तुम्ही भोंगा काढण्याबाबत का बोलत नाही. आमची सभा आणि हिंदुत्वाची लाट पाहून शिवसेनेच्या पोटात दुखतंय आणि त्यातून हे सगळं सुरु आहे," असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले.

भाजप, मनसेवर तुटून पडा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (29 एप्रिल)  वर्षा बंगल्यावर बोलावलेल्या शिवसेना प्रवक्त्यांच्या बैठकीत शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याविषयी सूचना दिल्या होत्या. शिवसेना विरुद्ध मनसे आणि भाजप असा सामना राज्यात रंगल्याचं चित्र आहे.अशातच मशिदींच्या भोंग्यावरुन राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा कुठेतरी हायजॅक केल्याची भावना असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपवर तुटून पडा असा संदेश दिला आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget