Happy Birthday Vidya Balan : 'हम पाँच'पासून 'शेरनी'पर्यंतच्या संघर्षाची 'कहानी'
Happy Birthday Vidya Balan : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनचा आज 43वा वाढदिवस आहे. विद्या बालनने तिच्या अभिनयाचे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप सोडली आहे.
Happy Birthday Vidya Balan : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनचा आज 43वा वाढदिवस आहे. विद्या बालनचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी जन्मलेल्या मुंबईत झाला. विद्याला सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. यासाठी विद्याला मोठा संघर्ष करावा लागला. मात्र 'परिणिता' चित्रपटानंतर तिचा संघर्ष संपला. लोक काय म्हणतील याची पर्वा न करणारी ही अभिनेत्री आज खूप सुंदर आयुष्य जगत आहे. विद्या बालनच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूयात.
विद्या बालनला सुरुवारील दक्षिणात्या चित्रपटसृष्टीत अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत एक मल्याळम चित्रपट मिळाला होता. हा चित्रपट काही कारणाने रखडला आणि याचं कारण विद्या बालनला मानले जाऊ लागले. यानंतर विद्याला अपशकुनी म्हणत तिला अनेक चित्रपटांपासून दूर करण्यात आले. यानंतर विद्या बालनला अनेक नकारांना सामोरे जावे लागले.
विद्याने 'हम पाँच' या टीव्ही मालिकेत नशीब आजमावले. यानंतर तिने छोट्या पडद्यावरील अनेक जाहिरातींमध्ये काम केले. यातील बहुतांश जाहिराती प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. विद्या प्रदीप सरकार यांना दादा म्हणायची. यादरम्यान विद्याने विनोद चोप्राच्या आगामी 'परिणीता' चित्रपटासाठी ऑडिशन दिले.
'परिणिता' या चित्रपटासाठी विद्याला 60 हून अधिक स्क्रीन टेस्ट द्याव्या लागल्या होत्या. एका क्षणी, तिला वाटले की हा चित्रपटासाठी देखील ती नाकारली जाईल. मात्र या चित्रपटासाठी अखेर विद्या बालनची निवड झाली आणि 2005 मध्ये आलेल्या 'परिणिता' या चित्रपटाने विद्या बालनचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
13 वर्षांच्या कारकिर्दीत विद्याने बॉलिवूडमध्ये आपली पकड मजबूत केली. 'भूल भुलैया' चित्रपटापासून ते 'द डर्टी पिक्चर'च्या बोल्ड कॅरेक्टरपर्यंत किंवा 'कहानी'ची दमदार अभिनेत्री, विद्याने तिच्या प्रत्येक भूमिका चोख बजावली.
महत्त्वाच्या बातम्या :
- तिसरी लाट? या महिन्यात सक्रिय रुग्ण 2 लाखांवर जाण्याची शक्यता, आरोग्य सचिवांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
- दिलासादायक! 2022 मध्ये कोरोना संपणार, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य
- आजपासून तुमच्या आयुष्यात होणाऱ्या 'या' बदलांसाठी तयार राहा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha