Shiv Jayanti 2022 : मुंबईकरांनो, 'बेस्ट'ने प्रवास करणार आहात?; मग ही बातमी वाचा
शिवजयंतीला काही तास शिल्लक राहिले असून महाराजांच्या जन्मदिनाची राज्यभरातील शिवभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बेस्ट प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Shiv Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी रोजी तारखेनुसार जयंती आहे. शिवजयंतीला (Shiv Jayanti) काही तास शिल्लक राहिले असून महाराजांच्या जन्मदिनाची (Shiv Jayanti 2022) राज्यभरातील शिवभक्त (ShivBhakt) आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला बेस्ट प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी शिवजयंतीला बेस्ट कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेस्टने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे शनिवारी घराबाहेर पडताना बेस्टचं वेळापत्रक पाहायला विसरु नका.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, सुट्टीच्या वेळापत्रकाप्रमाणे मुंबईतील बेस्टच्या बसेस धावतील, असे ट्विट BEST Bus Transport कडून करण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी तुम्ही कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर उद्या बेस्ट बसेस मर्यादीत धावणार आहेत. बेस्टच्या वेळापत्रकानुसारच आपला बाहेर जाण्याचा प्लॅन करा..
On 19.02.2022 (Saturday) on account of Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti, It is a declared Public Holiday on this day BEST routes/buses will be operating as per Holiday Schedule.#bestupdates #ChhatrapatiShivajiMaharaj
— BEST Bus Transport (@myBESTBus) February 18, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी शिवजयंती -
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यामुळे यंदाची ही महाराजांची 392 वी शिवजयंती असणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रभाव असल्याने शिवजयंती निर्बंधाखाली होती. पण यंदा रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात असल्याने शिवजयंती काही प्रमाणात नक्कीच साजरी होईल. त्यामुळे सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
हे ही वाचा-
- Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
- Shiv Jayanti 2022 : शिवस्मारक आपल्या खासगी जागेत उभारा, अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना पुरुषोत्तम खेडेकर यांनी ठणकावलं
- Ser Sivraj Hai : ‘शिवजयंती’निमित्ताने खास भेट, महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान करणारे 'सेर सिवराज है' रसिकांच्या भेटीला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha