एक्स्प्लोर

Ser Sivraj Hai : ‘शिवजयंती’निमित्ताने खास भेट, महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान करणारे 'सेर सिवराज है' रसिकांच्या भेटीला!  

‘सेर सिवराज है’ हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित नवे कोरे गीत एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Ser Sivraj Hai : ‘रामायण’, ‘महाभारता’त आजवर अनेक राजांनी आपली भूमिका चोख निभावली. हे राजे शूरवीर होते, दानशूर होते, न्यायी होते. अशा महान, पराक्रमी राज्यांची परंपरा आपल्याला लाभली असली, तरी ‘रयतेचा राजा’ असे म्हटले की, समोर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे कुठले नाव येत नाही. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. यानिमित्त महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचे गुणगान प्रसिद्ध पार्श्वगायक दिव्य कुमार 'सेर सिवराज है' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आला आहे.

दिव्य कुमारने हिंदी मराठी विश्वात गायलेल्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. नावाजलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी गात, त्याने मराठीतील 'फत्तेशिकस्त', 'कट्यार काळजात घुसली' या सारख्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांना बुलंद आवाज दिला. आता महाराजांचे गुणगान गाणारे आणि महाराजांच्या साम्राज्यातले महा कविभूषण यांच्या काव्यावर आधारित रचलेले हे गीत दिव्य कुमारने गायले असून 'मानस मराठी' प्रस्तुत असून संजय पटेल निर्मित आहे.

पाहा गाणे :

‘सेर सिवराज है’ हे छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित नवे कोरे गीत एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. दिग्दर्शक म्हणून ज्ञानेश्वर राजकुले यांनी बाजू गाण्याची उत्तम बाजू सांभाळली.

'सेर सिवराज है' हे गाणे सुप्रसिद्ध गायक दिव्य कुमार यांनी स्वरबद्ध केले आहे. ‘माझा मल्हार’, ‘हे गजानन’ या गाण्यांचे दिग्दर्शन संगीत दिग्दर्शक प्रसाद शिरसाठ यांनी केले असून, ‘देव महादेव’, ‘तू जोगवा वाढ’ ही गाणी अद्याप प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. या गाण्याचे संगीत संयोजनही प्रसाद शिरसाठ यांनी केले असून, गाण्याचे बोल आणि दिग्दर्शनातही त्यांचा खारीचा वाटा आहे.

शिवाय कविभूषण, योगेश खरात, स्मिता कुलकर्णी, प्रसाद शिरसाठ यांचा देखील गाण्याचे बोल लिहिण्यात वाटा आहे. या गाण्याचे रेकॉर्डिंग 'अपोस्ट्रॉफी स्टुडिओ' नाशिक, 'डॉन स्टुडिओ' पुणे आणि 'साउंड आयडियाज स्टुडिओ' मुंबई येथे पार पडले. या गाण्यात पुण्याचा लाडका रिल्स स्टार ऋषिकेश कणेकर, चैताली जाधव, अखिल सुगंध, हर्षवर्धन निकम यांनी भूमिका साकारल्या आहेत. महाराजांच्या जयंतीनिमित्त हे नवे गाणे 'मानस मराठी' युट्यूब चॅनेल वर प्रसारित होणार असून, शिवभक्तांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Marathi serial Mi Kaat Takli: नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
नागपंचमीच्या मुहूर्तावर ‘मी कात टाकली’चा श्रीगणेशा; नागिणीच्या भूमिकेत कोण अभिनेत्री? प्रेक्षकांची उत्सुकता ताणली
OTT Upcoming Thriller: ''पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
'पाताल लोक’च्या मेकर्सचा नवा क्राइम थ्रिलर! मित्राच्या मृत्यूचं गूढ अन् धक्कादायक ट्विस्टचा थरार घालणार OTTवर धुमाकूळ
TikTok Star Ayesha Gilmani: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर धाड धाड फायरिंग, मानेवर गोळी लागली अन्...; हल्लेखोर पसार, CCTV Video
Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget