एक्स्प्लोर
मुंबईत ओला-उबर चालकांचा संप, चार दिवसात दुसऱ्यांदा एल्गार
मुंबई : मुंबईतील ओला आणि उबरचे चालक आपल्या मागण्यांसाठी आज आझाद मैदानावर धरणं आंदोलन करणार आहेत. ओला-उबर चालकांच्या संपाची ही गेल्या चार दिवसातील दुसरी घटना आहे.
घटत जाणारे उत्पन्न, कंपन्यांकडून आकारले जाणारे वाढीव शुल्क, प्रोत्साहन रकमेत करण्यात आलेली कपात या पार्श्वभूमीवर ओला आणि उबर चालकांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे.
सरकार आणि कॅब कंपन्यांनी आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 21 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कॅब चालकांनी दिला आहे. यापूर्वी 10 मार्चला केलेल्या आंदोलनात चालकांनी 'ओला'च्या अंधेरीतील आणि 'उबर'च्या कुर्ल्यातील कार्यालयावर मोर्चा नेला होता.
दरम्यान, या आंदोलनात बहुतांश चालक सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईत ओला-उबरने प्रवास करणाऱ्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता खूपच कमी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement