एक्स्प्लोर

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा विधीमंडळात पाठिंबा आणि कोर्टात विरोध; भुजबळांचे टीकास्त्र

OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

OBC Reservation : राज्यात रखडलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणात अडथळे आणले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.  राहुल वाघ आणि विकास गवळी यासारखे लोक OBC आरक्षणाला बाधा येईल अशी कृती करत आहेत. त्यांनी कोर्टात याचिका दाखल करून संपूर्ण प्रक्रिया लांबवली आहे. हे लोकं भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकीकडे विरोधी पक्ष म्हणून OBC आरक्षणासाठी पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात याचिका करायची, असा भाजपचा दुहेरी डाव सुरू असल्याचा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला. भाजप नेत्यांच्या अशा पावित्र्यामुळे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचेही नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागास आयोगाची भेट घेतली. राज्य मागास आयोगाची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी सांगितले की, सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केले नाही. सुप्रीम कोर्टाला आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी इम्पेरिकल डेटा हवा आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्यापैकी आता एक महिना झाला असून अधिकारी त्यावर काम करत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. इम्पेरिकल डेटा लवकरच उपलब्ध करून द्यावी  अशी मागणी केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. मध्य प्रदेशात हा डेटा महसूल विभागाने जमा केला आहे. इतर राज्यांनी कोणती पावले उचलली आहेत याची माहिती घेऊन कोर्टात टिकेल असा डेटा तयार करण्याची विनंती केली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांना विनंती करणार

ओबीसी आरक्षणासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सरकारची मदत केली आहे. आता कोर्टात जाऊन ओबीसी आरक्षणाला कोर्टात जाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आवरण्याची विनंती करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. 

त्या जागेवर ओबीसी उमेदवार 

राज्यातील ओबीसी आरक्षणाचा तिढा न सुटल्यास त्या जागेवर आम्ही ओबीसी उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही भुजबळांनी स्पष्ट केले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget