उत्तर मुंबई कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, अत्यावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द
सध्या उत्तर मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात अवघ्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक सेवा वगळता शिथीलता रद्द करण्यात आली आहे.
मुंबई : सध्या उत्तर मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. मुंबई शहरातील कोरोनाचा ग्रोथ रेट कमी होत असताना पश्चिम उपनगरे आणि विशेषत: उत्तर मुंबईतील काही भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. उत्तर मुंबईत जीवनावश्यक वस्तू वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सील इमारतींमधील नियमांच्या अंमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तर, महापालिकेचे नियम धुडकावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरात अवघ्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज घडीला कांदिवलीमध्ये 2090, मालाडमध्ये 3378३, बोरिवलीमध्ये 1825, तर दहिसरमध्ये 1274 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. रुग्ण दुपटीचा काळ कांदिवलीत 25, मालाडमध्ये 19, बोरिवलीत 18, तर दहिसरमध्ये 15 दिवस आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे कांदिवली ते दहिसर दरम्यान 115परिसर प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. रुग्ण सापडल्याने 908 पैकी काही इमारती संपूर्ण, तर काही अंशत: सील करण्यात आल्या आहेत.
महापालिकेचे आता मिशन उत्तर मुंबई...
- दहिसरमधील गणपत पाटील नगर, आय.सी कॉलनीचे काही विभाग, केतकीपाडा, काजू पाडा, इतर दाटीवाटीचे आणि झोपडपट्ट्यांच्या परिसरामध्ये कडक लॉकडाऊन पाळले जाणार आहे.
- या विभागातील कंटन्मेंट झोन आणि सीलबंद इमारतीमधील अत्यावश्यक सेवा वगळता बाकी दुकान बंद ठेवली जाणार आहेत.
- उत्तर मुंबईतील 115 कंटेन्मेंट झोन, 908 इमारतींवर विशेष लक्ष आहे.
- कांदिवली ते दहिसर दरम्यान कंटन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक, जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सेवा बंद
- कांदिवलीत (2090 रुग्ण), मालाडमध्ये (3378 रुग्ण), बोरिवली (1825 रुग्ण), दहिसरमध्ये (1274 रुग्ण) या चार भागात रुग्णदुपटीचा कालावधी 15 ते 20 दिवसांचा आहे.
- कंटेन्मेंट झोनमधील रहिवासी नियमांचे पालन करत नाहीत आणि त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होत नाही. त्यामुळे कंटन्मेंट झोन आणि सील केलेल्या इमारतींमधील रहिवाशांवरील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील इमारतीत रुग्ण सापडल्यास ती संपूर्ण इमारत टाळेबंद करण्यात येईल. तेथील दुकानेही बंदच राहतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.