एक्स्प्लोर

'काँग्रेसनं आग्रह धरावा, मुख्यमंत्रीपद नाही दिलं तर पाठिंबा काढावा' : रामदास आठवले

Ramdas Athawale Comment: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला एक भन्नाट सल्ला दिला आहे.

मुंबई : राज्य सध्या कोरोनाची लढाई लढत असताना दुसरीकडे राजकीय खलबतंही जोरदार होऊ लागली आहेत.  काँग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला एक सल्ला दिला आहे. फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेस ने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल.  त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा  आग्रह धरला पाहिजे जर काँग्रेस ला मुख्यमंत्री पद दिले जात नसेल तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 

आठवले यांनी म्हटलं आहे की, नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची इच्छा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्री पद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर महाविकास आघाडी सरकार चा पाठिंबा काँग्रेस काढला पाहिजे असे  रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. 

नाना पटोले यांचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करणारा व्हिडीओ व्हायरल

नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करणारा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री असतील. काँग्रेसमुळे सरकार अडचणीत येणार नाही असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 

शिवसेना-राष्ट्रवादीची जवळीक काँग्रेसला सलतेय? महाविकासआघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार?

नुकताच शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त महाविकास आघाडी सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. पण शरद पवार यांनी आपल्या पक्षाबाबत भूमिका मांडली मी माझ्या पक्षबाबत भूमिका मांडली असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

"आम्हाला सोबत राहून पाठीत सुरा खुपसायची सवय नाही, काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार" : नाना पटोले

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवल्यास भाजपला मदत होईल का? याबाबत नाना पटोले यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत काय झालं बघितलं असा उपहासात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

मित्रपक्षांचं काही माहित नाही पण आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

जनभावना काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी आहे आणि काँग्रेस 2024 मध्ये राज्यात एक क्रमांकाचा पक्ष असेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. एकूणच सरकार पाच वर्षे पूर्ण करण्याआधीच महाविकास आघाडीत काँग्रेसने स्वबळाचा नारा देत मुख्यमंत्री पदाबाबत दावा केला आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले

बुलडाण्यात बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, "ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचं प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केलीय. विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही."

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget