एक्स्प्लोर
Advertisement
अग्निशमनचे जवान राजेंद्र भोजनेंना शहीदाचा दर्जा नाहीच
मुंबई : कावळा काढताना मृत्युमुखी पडलेले अग्निशमन दलाचे जवान राजेंद्र भोजनेंना शहीदाचा दर्जा देण्यात येणार नाही. विजेचा झटका लागल्यानंतर उपचारादरम्यान राजेंद्र भोजने यांचा 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता.
मुंबई सेंट्रल येथे तारेला अडकलेल्या कावळयाची सुटका करण्यास गेलेल्या अग्निशमन दलाच्या तीन जवानांना विजेचा झटका लागला होता. त्यात तिघेही जखमी झाले. भाजलेल्या जवानांवर नवी मुंबईतील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान राजेंद्र भोजने यांचा 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाला.
कर्तव्य निभावत असताना मृत्यू झालेल्या या जवानाला शहीद म्हणून घोषित करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे. प्रबोधनकार ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्र भोजनेंचा उल्लेख 'शहीद' म्हणून केला होता. त्यामुळे भोजने यांना शहीद घोषित करण्याची मागणी करणारं पत्र महापौर स्नेहल आंबेकर यांच्याकडून अपेक्षित असल्याचं म्हटलं जातं. मात्र तशी मागणी किंवा त्यांना अर्थसहाय्य देण्याची घोषणा महापौर किंवा विरोधीपक्षांनी केली नाही.
बुधवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भोजने यांना केवळ श्रद्धांजली वाहण्यात आली. यापूर्वी गोकुळ इमारत आग दुर्घटनेत कर्तव्य निभावताना मृत्यू पावलेल्या नेसरीकर व अन्य जवान आणि अधिकाऱ्यांना शासनाने शहीद घोषित केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement