एक्स्प्लोर

मास्‍क नसल्‍यास बेस्‍ट बससह टॅक्‍सी, रिक्षामध्‍ये प्रवेश नाही, कारवाई तीव्र करण्‍याचे मुंबई महापालिका आयुक्‍तांचे निर्देश

सार्वजनिक ठिकाणी मास्‍क योग्‍यप्रकारे परिधान न करणा्ऱ्यांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये 200 यानुसार दंडात्‍मक कारवाईदेखील यापूर्वीच सुरु करण्‍यात आली आहे.

मुंबई : ‘कोविड-19’ या संसर्गजन्‍य आजारावर नियंत्रण मिळवण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महापालिकेद्वारे करण्‍यात येत असलेल्‍या विविध स्‍तरीय कार्यवाही अंतर्गत ‘विना मास्‍क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्‍मक कारवाई अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांनी महापालिकेच्‍या अतिवरिष्‍ठ अधिकाऱ्यांच्‍या बैठकीदरम्‍यान दिले आहेत. या अंतर्गत बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी ‘मास्‍क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्‍क, नो एन्‍ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्‍याचे निर्देश दिले आहेत. त्‍याचबरोबर सर्व बसेस, टॅक्‍सी, रिक्षा इत्‍यादींवर देखील याच आशयाचे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देश देण्‍यात आले असून, या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्‍याचे निर्देशही महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत.

तोंड व नाक योग्‍यप्रकारे झाकले जाईल, अशाप्रकारे मास्‍क अर्थात मुखपट्टीचा वापर करणे, हा ‘कोविड-19’ या संसर्गजन्‍य आजाराला प्रतिबंध करण्‍याचा सर्वात प्रभावी उपाय असल्‍याचे आरोग्‍य व वैद्यकीय क्षेत्रातील जगभरातील तज्‍ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात देखील नागरिकांद्वारे मास्‍कचा सुयोग्‍य व परिपूर्ण वापर व्‍हावा, यासाठी बृहन्‍मुंबई महापालिका सातत्‍याने जनजागृतीपर कार्यवाही करीत आहे. त्‍याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी मास्‍क योग्‍यप्रकारे परिधान न करणा्ऱ्यांवर प्रत्‍येक वेळी, प्रत्‍येक ठिकाणी रुपये 200 यानुसार दंडात्‍मक कारवाईदेखील यापूर्वीच सुरु करण्‍यात आली आहे. ही कारवाई अधिक व्‍यापक व अधिक तीव्र करण्‍याचे निर्देश महापालिका आयुक्‍त इक्‍बाल सिंह चहल यांनी आज दिले आहेत.

यानुसार आता लवकरच महापालिका क्षेत्रातील कार्यालये, आस्‍थापना, मॉल्‍स, सोसायटी, सभागृह इत्‍यादी ठिकाणी निर्देश फलक बसविण्‍यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही तात्‍काळ सुरु करण्‍याचे आदेश महापालिका आयुक्‍तांनी दिले आहेत. त्‍याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतील बसेस, रिक्षा, टॅक्‍सी इत्‍यादींवर देखील ‘मास्‍क नसल्‍यास प्रवेश मिळणार नाह‍ी’, अशा आशयाचा मजकूर असणारे स्‍टीकर्स लावण्‍याचे निर्देश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Embed widget