एक्स्प्लोर
Advertisement
पनवेल मनपा आयुक्त सुधाकर शिंदेंविरोधात अविश्वास ठराव पास
पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन दीड वर्ष झालं आहे. पहिले आयुक्त म्हणून सुधाकर शिंदे यांची वर्णी लागली.
पनवेल : पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी आज अविश्वास ठराव पास केला. 50 विरुद्ध 22 मतांनी हा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला.
पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन दीड वर्ष झालं आहे. पहिले आयुक्त म्हणून सुधाकर शिंदे यांची वर्णी लागली. पण महापालिकेत बहुमतात असलेल्या भाजप नगरसेवक आणि आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पटेनासं झालं होतं. आयुक्त कोणत्याच प्रकारची नागरी कामं करत नसल्याचा आक्षेप सत्ताधारी भाजपाने घेतला आहे.
कचरा प्रश्न, पाणी, सार्वजनिक भूखंड, मैदानं या महत्वाच्या कामात आयुक्तांना अपयश आल्याचं कारण देत भाजपाने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. भाजपाच्या 50 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या बाजूने तर शेकाप आघाडीच्या 22 नगरसेवकांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं.
अविश्वास प्रस्ताव पास केल्यानंतर पनवेलच्या विकासासाठी मुख्यमंत्री दखल घेतील, असा विश्वास भाजपला आहे. तर सुधाकर शिंदे यांची बदली मुख्यमंत्री करणार नाहीत, असा आशावाद विरोधी पक्षाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement