वानखेडे स्टेडियमला IPL साठी अतिरिक्त पाणी पुरवठा नाही : बीएमसी
आयपीएल सामान्यासाठी जवळपास 40 लाख लिटर पाणी लागते. दोन वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ असताना क्रिकेटच्या सामन्यांसाठी पाणी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका लोकसत्ता मुव्हमेंट या सामाजिक संघटनेने केली आहे.

आयपीएल सामान्यासाठी जवळपास 40 लाख लिटर पाणी लागते. दोन वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ असताना क्रिकेटच्या सामन्यांसाठी पाणी देऊ नये, अशी मागणी करणारी जनहित याचिका लोकसत्ता मुव्हमेंट या सामाजिक संघटनेने केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळची दुष्काळाची गंभीर स्थिती पाहता अशाप्रकारे पाण्याची उधळपट्टी थांबवायला हवी, जेणेकरुन भविष्यात पुन्हा असं संकट आल्यास पाण्याची वानवा होणार नाही, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. पिण्यास योग्य असलेले पाणी खेळपट्टीसाठी कधीही वापरलं नसल्याचा दावा एमसीएच्यावतीने याआधीच हायकोर्टात करण्यात आला आहे.
Before You Go
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?





















