एक्स्प्लोर

नीरव मोदीचा अलिबागमधील बेकायदेशीर बंगला 2011 मध्येच नियमित

मुळात एसडीओंनी जी गोष्ट करणं अपेक्षित होती, ती जिल्ह्याधिकाऱ्यांनी केलीच कशी? त्यांना हा अधिकार दिला कोणी? असा संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत हायकोर्टाने या प्रकरणी आता महसूल खात्यामार्फत चौकशीचे आदेश देण्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर पीएनबी प्रकरणातील फरार मुख्य आरोपी नीरव मोदी याचा बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेला बंगला 2011 मध्येच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित केला होता, अशी धक्कादायक माहिती मंगळवारी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. या सगळ्या प्रकाराबद्दल हायकोर्टाने तीव्र संताप व्यक्त केला. मुळात एसडीओंनी जी गोष्ट करणं अपेक्षित होती, ती जिल्ह्याधिकाऱ्यांनी केलीच कशी? त्यांना हा अधिकार दिला कोणी? असा संतप्त सवाल हायकोर्टाने विचारला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत हायकोर्टाने या प्रकरणी आता महसूल खात्यामार्फत चौकशीचे आदेश देण्याचे संकेत दिले आहेत. 2011 मध्ये बांधकाम नियमित केलं असेल तर मग आत्ता या वर्षी पुन्हा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे याबद्दल तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलंच का? असा सवालही हायकोर्टाने विचारला. तसेच “खरंतर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहा असं सांगावं वाटत नाही, पण या प्रकरणात जे काही झालंय त्याला काही अर्थच नाही" अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारून काढलं आहे. सुरेंद्र ढवळे यांनी अलिबागमधील समुद्र किनारी भरती आणि ओहोटीच्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरूय. ही सगळी बांधकामं महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीचे नियम आणि राज्य सरकारचे जमिनविषयक असलेल्या कायद्यांचं उल्लंघन करुन करण्यात आली आहेत, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. अलिबागमधे सीआरझेडचं उल्लंघन करुन 175 ठिकाणी असे बंगले बांधण्यात आले असल्याचं याचिकेत म्हणण्यात आलंय. यात नीरव मोदीसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटिजसह उद्योगपती आणि वरिष्ठ वकील यांच्या मालकीचे बहुतांश बंगले आहेत, असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. शेतीसाठी असलेली जमीन विकत घेऊन त्यावर हे बंगले बांधण्यात आले. नीरव मोदीला 390 चौरस मीटर भागात बांधकाम करण्याची परवानगी असताना त्याने 1000 चौरस मीटरपेक्षा अधिक भागात बांधकाम केलं असल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितलं. या आणि अशा सगळ्या अनधिकृत बांधकामांकडे सोयीस्कर कानाडोळा करण्यात आला असल्याचं याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. संबंधित बातमी :

नीरव मोदीचा अलिबागमधील आलिशान बंगला आणि कार सील

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget