Mumbai Police : मुंबई पोलिसांना कोरोनाचा विळखा, मागील 24 तासात 93 पोलिसांना कोरोनाची लागण
Mumbai Police : जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत मुंबईत 9 हजार 657 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई : मुंबईमध्ये कोरोना महामारीने (Corona) पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढली असून कोरोना रुग्णांचा स्फोटच मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. निवासी डॉक्टरानंतर आता पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत तब्बल 93 पोलीस
कर्मचाऱ्यांना कोरोनाची झाली आहे.
कोरोनाच्या वाढता धोक्यामुळे पोलिसांनाही संकटाचा सामना करावा लागतोय. जनतेच्या सेवेसाठी महाराष्ट्र पोलिसांना 24 तास रात्रंदिवस कामावर रुजू व्हावे लागत आहे. आतापर्यंत 9 हजार 657 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आलेख चढताच
शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 रुग्णांची नोद झाल्याने प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पण दररोज हजारोंच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज केवळ 790 ने वाढल्याने कोरोना रुग्णसंख्या आज कुठेतरी स्थिरावल्याचं समोर आलं आहे. मुंबई महामगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 8 हजार 490 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 53 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 394 झाली आहे. सध्या मुंबईत 91 हजार 731 सक्रीय रुग्ण आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Maharashtra Corona : पोलिसांनाही आता 'वर्क फ्रॉम होम', पोलिसांसाठी गृह विभागाचा मोठा निर्णय
Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, मागील 24 तासांत 20 हजार 971 नवे रुग्ण
Corona : मास्कच्या वापरात देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर, पुणे दहाव्या क्रमांकावर



















