Mumbai Corona Update : मुंबईतील कोरोना रुग्णांचा आलेख चढताच, मागील 24 तासांत 20 हजार 971 नवे रुग्ण
Mumbai Corona Update : मागील काही दिवसांपासून मुंबईत आढळणाऱ्य़ा कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. सोबतच रुग्णवाढीचा दरही वाढला आहे.

Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये कोरोना महामारीने (Corona) पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. मागील काही दिवसांत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढली असून कोरोना रुग्णांचा स्फोटच मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. आजही (शुक्रवारी) समोर आलेली मागील 24 तासांतील आकडेवारी 20 हजार 971 असल्याने प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पण दररोज हजारोंच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या कालच्या तुलनेत आज केवळ 790 ने वाढल्याने कोरोना रुग्णसंख्या आज कुठेतरी स्थिरावल्याचं समोर आलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत शुक्रवारी 8 हजार 490 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 64 हजार 53 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 394 झाली आहे. सध्या मुंबईत 91 हजार 731 सक्रीय रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 20 हजार 971 रुग्णांमध्ये 17 हजार 616 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे.
मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी
| तारीख | मुंबईतील रुग्णसंख्या |
| 21 डिसेंबर | 327 |
| 22 डिसेंबर | 490 |
| 23 डिसेंबर | 602 |
| 24 डिसेंबर | 683 |
| 25 डिसेंबर | 757 |
| 26 डिसेंबर | 922 |
| 27 डिसेंबर | 809 |
| 28 डिसेंबर | 1377 |
| 29 डिसेंबर | 2510 |
| 30 डिसेंबर | 3671 |
| 1 जानेवारी | 6347 |
| 2 जानेवारी | 8063 |
| 3 जानेवारी | 8082 |
| 4 जानेवारी | 10860 |
| 5 जानेवारी | 15166 |
| 6 जानेवारी | 20181 |
| 7 जानेवारी | 20971 |
महत्त्वाच्या बातम्या :
- Corona : मास्कच्या वापरात देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर, पुणे दहाव्या क्रमांकावर
- coronavirus : जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला जाताय? 'हे' नियम पाळले तरच मिळणार मंदिरात प्रवेश
- सभागृहात मास्क न वापरण्यावरून अजितदादांचा संताप, मंत्र्यांसह सदस्यांना झापलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























