एक्स्प्लोर
रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यावर, मात्र मातोश्री भेट नाही
भाजपचे राष्ट्रपतीचे उमेदवार रामनाथ कोविंद आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मात्र, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात कुठेही ‘मातोश्री भेटी’चा उल्लेख नाही. त्यामुळे ते मातोश्रीवर जाणार नसल्याचं स्पष्ट आहे.

मुंबई : भाजपचे राष्ट्रपतीचे उमेदवार रामनाथ कोविंद आज मुंबई दौऱ्यावर आहेत. विमानतळावर कोविंद यांचं जंगी स्वागत केलं जाणार असून त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित रहाणार आहेत. मुंबईत आल्यावर विमानतळावरुन रामनाथ कोविंद थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये जातील. तिथे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद साधतील. मात्र, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात कुठेही ‘मातोश्री भेटी’चा उल्लेख नाही. त्यामुळे ते मातोश्रीवर जाणार नसल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, भाजपप्रणित एनडीएने बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. त्यानंतर एनडीएमधील सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. रामनाथ गोविंद यांच्याविषयी 10 खास गोष्टी : सध्या बिहारचे राज्यपाल भाजपमध्ये दलित समाजचं प्रतिनिधित्व करणारं मोठं नाव दोन वेळेस राज्यसभेचे खासदार उत्तरप्रदेशच्या कानपूरचे रहिवाशी भाजपच्या दलित मोर्च्याचे अध्यक्षही होते. ऑल इंडिया कोली समाजाचे अध्यक्ष होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ताही होते. पेशानं वकिल 2002 मध्ये संयुक्त राष्ट्रात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. गृह मंत्रालयासह अनेक मंत्रालयाचे सदस्य होते.
आणखी वाचा























