एक्स्प्लोर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टाचा दणका

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांना सुप्रीम कोर्टाचा दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टानं पावणे एमआयडीसीमधील बाळखळेश्वर मंदिराची 33 एकर जागा ताब्यात घेण्याचे एमआयडीसीला आदेश दिले आहेत. या जागेवर नाईक यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने ट्रस्ट तयार करुन मंदिर, उद्यान तयार केले आहे. तर दुसरीकडे सीबीडी येथे खाडी किनारी नाईक यांचा भाचा संतोष तांडेलच्या नावाने जागा घेऊन, अनधिकृत ग्लास हाऊस उभारले होते. ही जागा ताब्यात घेण्याचे सिडकोला आदेश देण्यात आल्याने गणेश नाईक यांच्यासाठी धक्का असल्याचं बोललं जात आहे. या दोन्ही ठिकाणच्या जागेसंदर्भातील हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून संतोष तांडेल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने तांडेल यांची ही मागणी फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एमआयडीसी आपली जागा ताब्यात घेवू शकते. तर सीबीडीमध्ये ग्लास हाऊसच्या जागेवर सिडकोच्या माध्यमातून होणारे मरीना सेंटरचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















