एक्स्प्लोर

Sharad Pawar : राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा निशाणा, म्हणाले, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका...

Sharad Pawar On Raj Thackeray :  मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्याच्या सभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी (Sharad Pawar )आज उत्तर दिलं आहे. 

Sharad Pawar On Raj Thackeray :  मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्याच्या सभेत केलेल्या टीकेला शरद पवारांनी (Sharad Pawar )आज उत्तर दिलं आहे.शरद पवार यांनी म्हटलं की, राज ठाकरेंच्या वक्तव्याला  फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मला सकाळी लवकर उठावं लागतं.  फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो असा आरोप केला जातो. कारण हे महापुरुषही शिवरायांचा आदर्श घेऊन काम करायची. मी परवाच्या अमरावतीच्या भाषणात 15 मिनिटं शिवरायांवरच बोललोय. पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख होता त्याला माझा सक्त विरोध होता. तेव्हाही होता आणि आता ही विरोध आहे. जेम्स लेनचं लिखाण गलिच्छ होतं. त्याला ज्यांनी माहिती पुरवली ती योग्य नव्हती, असं पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, राज ठाकरेंच्या भाषणात महागाई आणि सर्व सामान्य यांचा उल्लेख किंचीतही नाही. भाषणात सर्वसामान्यांचा उल्लेख नव्हता. राष्ट्रवादी हा संपवणारा पक्ष असा त्यांनी उल्लेख केला मात्र महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची दखल घेतली, असं पवार म्हणाले.

ते म्हणाले की, भाषणात त्यांनी सोनिया गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान पदासाठी आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून आमचा विरोध नव्हता. आजही आम्ही एकत्र आहोत, असं ते म्हणाले.  पवार म्हणाले की, राज्यात वीजेचा प्रश्न आहे. कोळसा टंचाईचा प्रश्न आहे. यावेळी उष्णतेची लाट आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं ते म्हणाले.

शरद पवारांसंदर्भात काय म्हणाले होते राज ठाकरे
राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत शरद पवारांवर आरोप करताना म्हटलं होतं की, शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतंय. शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयतावाद वाढला. शरद पवार सांगतात हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. पण ते कधीच शिवरायांचे नाव घेत नाहीत. कारण त्यांना मुस्लिम मतांची काळजी आहे. महाराष्ट्र जातीच्या चिखलात अडकला आहे. पवारांसारख्या बुजूर्ग राजकारण्यांनी या राज्यातील जातीय भेद संपवले पाहिजेत. पण तेच लोकांना यात अडकवतात. घराघरात ज्यांनी शिवचरित्र पोहोचवलं ते बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होते. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. यांच्यामुळेच मराठा-ब्राह्मण वाद वाढतोय. हे त्यांच्या राजकारणासाठीच सुरू आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Uddhav Thackeray : 'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
'मातोश्री'वरील बैठकीत पदाधिकाऱ्यांत जुंपली, उद्धव ठाकरेंचा पारा चढला अन्...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
Embed widget