NCB ची मोठी कारवाई, श्रीलंकेच्या बोटमधून 300 किलो हेरॉईनसह AK47चा साठा जप्त, पाकिस्तानी कनेक्शन समोर
चेन्नई झोनल नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो युनिटने मोठी कारवाई केली आहे. श्रीलंकेच्या एका बोटमधून 300 किलो हेरॉईन ड्रग्स मोठया प्रमाणात आणि AK 47 बंदुकी जप्त केल्या आहेत. या कारवाईचं कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचं देखील समोर आलं आहे.
मुंबई : चेन्नई झोनल नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो युनिटने मोठी कारवाई केली आहे. श्रीलंकेच्या एका बोटमधून 300 किलो हेरॉईन ड्रग्स मोठया प्रमाणात आणि AK 47 बंदुकी जप्त केल्या आहेत. या कारवाईचं कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचं देखील समोर आलं आहे. चेन्नईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो युनिटला माहिती मिळाली की श्रीलंकेमधून एका बोटीमध्ये ड्रग्स आणि हत्यारं भारतात येणार आहेत. त्याप्रमाणे चेन्नई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने भारतीय तटरक्षक दलात बरोबर सापळा रचला आणि श्रीलंकेमधून येणाऱ्या बोटीला ताब्यात घेतलं. ज्यामध्ये 300 किलो हेरॉईन मोठ्या प्रमाणात हत्यारं होती. तसेच 6 श्रीलंकन नागरिकांना सुद्धा चेन्नई नार्कोटिक्सच्या टीमने अटक केली आहे.
श्रीलंके मधून रवीहंसी नावाची बोट भारतात येणार याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. भारताच्या हद्दीत बोट येताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम आणि भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने त्या बोटला अडवलं. बोटची जेव्हा झडती घेण्यात आली तेव्हा संपूर्ण बोल पिवर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये 301 पाकीटं मिळाली ज्यामध्ये सफेद रंगाची पावडर होती, जी कोकेन होती. पॅकेटवर घोड्याचे चित्र होतं. ड्रग्सच्या ब्रॅण्डिंगसाठी हे असे चित्र वापरण्यात येत असल्याचं चेन्नई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे डायरेक्टर अमित घवाते यांनी सांगितलं. तर पाच AK 47 आणि 1000 गोळ्या सुद्धा चेन्नई एनसीबीने या बोटवरून जप्त केल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
बोट वर सापडलेले ड्रग्स आणि हत्यारांचे पार्सल चाबाहार बंदर इराणवरून आलं होतं. ते पार्सल श्रीलंकेच्या बोटवर लक्ष्यदीप येथील समुद्री भागात ठेवण्यात आलं. जे श्रीलंकेत नेण्यात येणार होतं, मात्र त्या आधीच चेन्नई कंट्रोल समुद्रामध्ये कारवाई करत बोट आपल्या ताब्यात घेतली. ही बोट भारतीय हद्दीतून श्रीलंकेला जाणार होती.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव एल वाय नंदाना, एचकेजीबी दासपप्रिया, AHS गुणसेकरा, एसएएस सेनारथ, टी रानासिंगा, डी निससंका असून हे सर्व श्रीलंकेचे नागरिक आहेत. यांना 27 मार्चला अटक करण्यात आली असून सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासामध्ये जे ड्रग्स आणि हत्यार चेन्नई एनसीबीने पकडली आहेत त्यांचं कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही तर याआधी सुद्धा अरब महासागरात अशाप्रकारे ज्या कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सुद्धा पाकिस्तानचं कनेक्शन स्पष्ट झालं होतं. या कारवाईमुळे ड्रग माफिया आणि अतिरेकी घटकांचं कनेक्शन उघड झालं असून तपास यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
सदरची कारवाई चेन्नई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर अमित घवाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिटेंडेंट एम सुरेश कुमार, आशिष कुमार ओझा, इंटेलिजन्स ऑफिसर सैजु वरगिसे, मॅथ्यू वरगिसे, सॅमसन, डी प्रमिला, शानमुगम या पथकाद्वारे करण्यात आली.