एक्स्प्लोर

मंत्री नवाब मलिक यांच्या गंभीर आरोपांनंतर एनसीबीची पत्रकार परिषद; म्हणाले..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर एनसीबीने आज पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Mumbai Cruise Drugs Case: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहेत. ही कारवाई बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबी कार्यालयात घेऊन जाणाऱ्या व्यक्ती भाजप कार्यकर्ते मनिष भानुशाली आणि के. पी गोसावी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. या खळबळजनक आरोपानंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

एनसीबीचे अधिकारी काय म्हणाले?
आम्ही केलेली सर्व कारवाई कायदेशीर असून नवाब मलिक यांचे आरोप तथ्यहिन असल्याचं स्पष्टीकरण एनसीबीनं दिलं आहे. मनिष भानुशाली आणि के. पी गोसावी यांनी कारवाईमध्ये मदत केल्याची माहिती एनसीबीनं दिली आहे. या प्रकरणात ते साक्षीदार असल्याचे ते म्हणाले. एनसीबी अधिकारी म्हणाले, की आम्हाला सूचना मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रूझवर छापा मारण्यात आला. यात आठ जणांना ताब्यात घेतलं. ही सर्व लोकं घटनास्थळी मिळाली. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे ड्रग्ज मिळाले. यातील मोहक जयस्वालच्या माहितीनंतर जोगेश्वरीत छापा टाकला. यावेळी अब्दुल कादिर शेख नावाच्या व्यक्तीला ड्रग्जसोबत पडकण्यात आले. यानंतर गोरेगावमध्ये एनसीबी टीमने रेड टाकल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एनसीबीने अलीकडेच मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक केली आहे. काल या प्रकरणात आणखी 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली आहे. 

Cruise Party : क्रूझ ड्र्ग्ज पार्टी प्रकरण बनावट, ड्रग्ज प्रकरणाशी भाजपच्या मनिष भानुशाली आणि केपी गोसावी यांचा संबंध: नवाब मलिक

समीर वानखेडे म्हणाले की, आम्ही आणखी चार जणांना अटक केली आहे, जे ऑर्गनयझर आहेत. त्यांना कोर्टात दाखल केले जाईल. जे आम्हाला सांगायचे आहे ते कोर्टात सांगितले आहे. ते आम्ही शेअर करू शकत नाही. या प्रकरणात आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे. आमच्याकडे आणखी तपासासाठी वेळ आहे, चांगला तपास केला जाईल, असं ते म्हणाले.

काय आहेत मलिक यांचे आरोप?
नवाब मलिक म्हणाले की, "एनसीबीने शनिवारी मुंबईतील क्रूझवर टाकलेल्या छाप्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांना अटक केली होती. त्या दिवशी आर्यन खानला एक व्यक्ती खेचत एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जाताना फोटो व्हायरल होत होता. नंतर याच व्यक्तीने आर्यन खान सोबत सेल्फीही काढल्याचं व्हायरल झालं होतं. सुरुवातीला हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी असल्याचं सांगण्यात येत होतं. पण नंतर दिल्लीच्या एनसीबी कार्यालयाने हा व्यक्ती आपला अधिकारी वा कर्मचारी नसल्याचं स्पष्ट केलं."

या व्यक्तीचे नाव के.पी. गोसावी आहे आणि तो स्वत: प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे असं सांगतो. त्यामुळे यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा दावा नवाब मलिकांनी केला आहे. 

नवाब मलिक पुढे म्हणाले की, "ड्रग बाळगल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीसोबत तो दुसरा व्यक्ती कोण होता हे एनसीबीने जाहीर करावं.  दुसरा एक व्यक्ती, ज्याने मरुन शर्ट घातलेला होता आणि जो अरबाज मर्चंटला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जात होता तोही व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. त्याचं नाव मनिष भानुशाली असून तो भाजपाचा उपाध्यक्ष आहे."

या मनिष भानुशालीचा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपच्या अनेक मंत्री आणि नेत्यांसोबत आहेच. एनसीबीने दावा केला आहे की क्रूझवर त्यांनी छापा मारला. त्यावर मग माहिती देताना आठ ते दहा लोक असल्याचा दावा केला होता. त्यावेळी आठ लोकांना अटक केली होती. मग इतर दोन कोण होते हे एनसीबीने स्पष्ट करावे.   

नवाब मलिक म्हणाले की, "गेल्या 36 वर्षांच्या काळात एनसीबीवर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला नाही. पण सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीचे कृत्य संशयास्पद आहे. त्यानंतर मुंबईत असलेल्या बॉलिवूडला ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु झाला. मुंबईतील क्रूझवर टाकलेल्या छापेमारी याच्याशीच संबंधित आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget