एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Cruise drug case: समीर वानखेडेंना पोस्टवरुन हटवलं नाही, पण..., एनसीबीकडून स्पष्टीकरण

Sameer Wankhede Updates : मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर  समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. आर्यन खानला अटक केल्यानंतर अनेकांकडून समीर वानखेडे यांच्या कारवाईवर आक्षेप घेण्यात आला होता.

Mumbai Cruise drug case : मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर  समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. आर्यन खानला अटक केल्यानंतर अनेकांकडून समीर वानखेडे यांच्या कारवाईवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यातच शुक्रवारी समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह इतर सहा ड्रग्ज केसचा तपास काढून घेतल्याच्या बातम्या आल्या. यावर आता एनसीबीकडून स्पष्टीकरण आलं आहे. समीर वानखेडे यांची बदली अथवा त्यांच्याकडून कोणत्याही केसेसचा तपास काढून घेतलेला नाही, अशाप्रकारचं स्पष्टीकरण आलं.

शुक्रवारी रात्री उशीरा एनसीबीकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये समीर वानखेडे यांना पदावरुन हटवलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. एनसीबीचे अधिकारी संजय कुमार सिंह यांनी याबाबतच परिपत्रक काढलं आहे. या ते म्हणतात, एनसीबी डायरेक्टरंच्या निर्देशानुसार एक एसआयटी कमिटी गठन केली आहे. जी मुंबई एनसीबीची सहा केसेस टेकओव्हर करेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लिंकचा यात चौकशी केली जाणार आहे.  कोणत्याही अधिकाऱ्याला पोस्टवरुन हटवण्यात आलेलं नाही. ते या ऑपरेशन ब्रांचला असिस्ट करत राहणार आहे. एनसीबी केंद्रीय पथक आहे, जो एकत्र मिळून देशभरातील केसेसचा तपास करते. 

समीर वानखडे हे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर या पदावर होते आणि त्या पदावरच ते राहणार आहेत.  मात्र ते आता रिपोर्टिंग दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना करणार आहेत. या सहा प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीचे अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली केला जाणार आहे. सहा प्रकरणात समीर वानखेडे संजय सिंह यांना मदत करत करणार आहेत. या सहा प्रकरणा व्यतिरिक्त आधीच्या प्रकरणांचा तपास समीर वानखेडे यांच्याकडेच असणार आहे. मात्र नवीन एखादी कारवाई करण्यासाठी आता त्यांना दिल्ली एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवावे लागणार असून त्यांची परवानगी लागणार आहे. दरम्यान, आपल्याला या केसमधून हटवलं गेलं नसून आपणच याचा तपास दिल्ली एनसीबीच्या एसआयटीकडे देण्यात यावा असं रीट पीटिशन दाखल केली होती असं समीर वानखेडे यांनी सांगितलं आहे.

नवाब मलिकांचं ट्वीट -

नवाब मलिक यांनी ट्विट करत समीर वानखेडे यांच्या एसआयची चौकशीची मागणी केल्याचं म्हटलं आहे. आर्यन खान याचं अपहरण आणि खंडणी मागितल्याप्रकरणी समीर वानखेडेंची एसआयटी चौकशी मागणी केल्याचं मलिक यांनी ट्विट करत सांगितलं आहे. केंद्र आणि राज्य अशा दोन एसआयटी पथकाची स्थापना झाली आहे. यापैकी कोण समीर वानखेडे आणि त्यांच्या खासगी आर्मीचं सत्य जगासमोर आणतेय पाहूयात..

Cruise drug case: समीर वानखेडेंना पोस्टवरुन हटवलं नाही, पण..., एनसीबीकडून स्पष्टीकरण

कोण आहेत संजय सिंह ?
संजय सिंह हे १९९६च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. आतापर्यंतच्या सेवेत त्यांनी अनेक प्रमुख पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे. ओडिशा पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त म्हणून ते रुजू झाले होते. त्यानंतर ओडिशा पोलीस दलातच ते महानिरीक्षक होते. पुढे सीबीआयमध्ये त्यांनी सेवा दिली. तिथे अनेक प्रकरणं त्यांनी हाताळली. सीबीआयमध्येही ते महानिरीक्षक या पदावर होते. तिथून ते एनसीबीमध्ये आले. सध्या ते उपमहासंचालक (ऑपरेशन) या पदाचा कार्यभार पाहत आहेत. सिंह यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांच्याकडे मुंबईतील हायप्रोफाइल प्रकरणं सोपवण्यात आली आहेत, असे बोलले जात आहे.

 कोण आहेत समीर वानखेडे?
सप्टेंबर 2020 मध्ये त्यांची महसूल गुप्तचर संचालनालयातून एनसीबीवर बदली झाली. अमली पदार्थांशी निगडीत प्रकरणांचे तज्ज्ञ म्हणून त्यांची खास ओळख आहे. आता शाहरुख खानच्या मुलाची चौकशी समीर वानखेडे करत आहेत. सध्या त्यांनी सुरु केलेल्या कारवायाच्या धडाक्यामुळं समीर वानखेडे हे ट्रेंडिंगमध्ये आहेत. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत त्यांच्या नेतृत्वात एनसीबीने कोट्यवधींच्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 2004 मधील बॅचचे आयआरएस अधिकारी असलेले समीर वानखेडे हे मूळचे महाराष्ट्रातील.  ते आधी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त होते. त्यानंतर त्यांनी बदली आंध्र प्रदेश आणि दिल्लीत देखील काम केलं. आतापर्यंत त्यांनी दोन हजारहून अधिक लोकांविरुद्ध अमली पदार्थविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास 17 हजार कोटींहून अधिक रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं आहे. बॉलिवूडमध्ये समीर वानखेडे या नावाची वेगळी दहशत आहे. समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंसीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे मारले आहेत. मुंबईमध्ये ड्रग्सचा नायनाट करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांचा केंद्रीय गृह विभागाकडून विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला आहे. समीर वानखेडे यांच्यासह भारतातील 152 आणि महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget