एक्स्प्लोर

ड्रग्ज प्रकरणात मंत्र्यांना अडकवण्याचा प्लॅन? नवाब मलिकांचा दावा, 'ते' मंत्री कोण

Mumbai Cruise Drugs case updates : किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

Mumbai Cruise Drugs case updates : आर्यन खानच्या (Aryan Khan) किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज असल्याचा मोठा आरोप मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik Press)केला आहे.  किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

यासोबतच मलिक यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. क्रूझ मध्ये जी केस बनवण्यात आली त्यामध्ये एक पेपर रोल बॉटल मिळाली होती. असं म्हणतात की ड्रग्ज घेण्यासाठी याचा वापर होतो. याचा मालक काशिफ खान आहे. त्याला आत्तापर्यंत अटक का झाली नाही. तो आमचे मंत्री अस्लम शेख यांना येण्यासाठी खूप फोर्स करत होता. तो व्यक्ती इतर देखील सेलिब्रिटींच्या मुलांना पार्टी मध्ये येण्यासाठी फोर्स करत होता. यांचा असा तर प्लॅन नव्हता ना की मंत्र्यांना बोलवून त्यांना अशा प्रकरणात त्यांना अडकवायचं? असं मलिक यांनी म्हटलं आहे. 

आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप 

आज नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे

1. कोर्ट प्रोसिडिंगमध्ये एक बाब वारंवार समोर आली आहे की प्रतीक गाभा आणि अमीर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यनला क्रूझवर आणण्यात आलं. हे सगळं प्रकरण किडनॅपिंग आणि खंडणी वसुली करण्याचं आहे. किडनॅपिंगचा मास्टर माईंड मोहित कंबोज (Mohit Kamboj) आहे. मोहित कंबोज हा आपलं हॉटेल चालवण्यासाठी शेजारी असणाऱ्या हॉटेलवर छापेमारी घडवून आणतो. यामध्ये समीर वानखेडे (Sameer Wankhede) त्याला मदत करतो.

2. 7 तारखेला मोहित कंबोज आणि समीर वानखेडे ओशिवरा कब्रस्तान येथे भेटले होते. त्यांचं नशीब चांगलं होतं की त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ मिळाला नाही. वानखेडे यांना सांगू इच्छितो की मी कोणाला पाठ करून पत्रकार परिषदेसाठी पाठवत नाही.

नवाब मलिकांकडून ऑडियो क्लिप ट्वीट, सॅनविल आणि NCB अधिकाऱ्यातील संवाद, नेमकं काय आहे त्यात...

3. मोहित कंबोज हा 1700 कोटी रुपये भ्रष्टाचार करणारा हा व्यक्ती आहे. सध्या भाजपमध्ये असलेले आणि पूर्वी काँग्रेसमध्ये असणाऱ्या एका नेत्यामागे हा फिरत असायचा. त्यानंतर सरकार बदललं आणि तो भाजपमध्ये गेला. दीड वर्षापूर्वी सीबीआयची छापेमारी करण्यात आली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण दाबण्यात आले.

4. 18 कोटींचं प्रकरण समोर आलं आहे. प्रभाकर सैल याने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जबाब दिला आहे. सध्या समीर वानखेडे यांना वाचण्यासाठी मोहित कंबोज आणि सॅम डिसुझा प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत.

5. माझ्यावर आरोप करण्यात येतो आहे की मी प्रभाकर सैलला शिकवून पोलीस ठाण्यात पाठवलं. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो 22 तारखेला मनोज संसारे यांचा मला फोन आला. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं के पी गोसावी आणि त्यांचा साथीदार आत्मसमर्पण करणार आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री यांना देखील यांना सांगितलं. मुख्यमंत्री यांनी डी जी पांडे यांना सांगितलं. त्यानंतर मला त्यांचा फोन आला. त्यानंतर पालघरची टीम मुंबईत येऊन थांबली होती. संसारे यांना फोन केला तर ते बोलले त्यांचा फोन बंद लागतो. त्यानंतर मात्र मी परत डीजींना फोन केला नाही. त्यानंतर दुपारी माझ्याकडे दुपारच्या सुमारास मनोज संसारे आणि प्रभाकर सैल आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला पुणे क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्यांनी माझं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं. त्यांनतर मी मुंबईत आलो, असं मलिक म्हणाले. 

6. सुनील पाटील याला मी कधीही भेटलो नाही. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही. सुनील पाटील हा भाजपच्या मंत्र्यांसोबत फिरत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिला मिळत आहेत. तो कोणत्या पार्टीचा व्यक्ती आहे हे मी बोलत नाही, असं मलिक म्हणाले. सुनील पाटील हा समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीचा भाग आहेत. 6 तारखेला पाहिल्यादा मला सुनील पाटीलचा फोन आला. तो येतो बोलला त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील फोन आला मात्र तो आला नाही. तो आज येणार होता परंतु आज अखेर तो आलेला नाही, असंही मलिक म्हणाले.

7. एक केस झाली होती. व्हीट बॅकरी केस मध्ये सचिन टोपे आणि त्याच्या बायकोला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सॅम डिसूजाला 23 जूनला एक नोटीस देण्यात आली होती. एनसीबीच्या वतीने हजर होण्यासाठी मात्र तो आज अखेर तो आलेला नाही. 23 जून पासून आज अखेर त्याची अटक का झाली नाही? 5 महिने याला अटक झाली नाही आणि आता तो समीर वानखेडे यांना क्लिनचिट देत आहे. हा दोन व्यक्तींसोबत काम करतो एक राजीव बजाज आणि दुसरा आहे प्रदीप नाम्बियार. हे दोघे पत्रकार आहेत. हे दोघे वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचे भाग आहेत. सॅम डिसुझाने हवाला मार्फत दिल्लीला पैसे पाठवले. तो हवाला सोबत फोनवर बोलत होता की मला हवालाची पावती द्या. हवालावाला त्याला म्हणतो हवालाची कधी पावती मिळते का?

8. क्रूझ मध्ये जी केस बनवण्यात अली त्यामध्ये एक पेपर रोल बॉटल मिळाली होती. असं म्हणतात की ड्रग्ज घेण्यासाठी याचा वापर होतो. याचा मालक काशिफ खान आहे. त्याला आत्तापर्यंत अटक का झाली नाही. तो आमचे मंत्री अस्लम शेख यांना येण्यासाठी खूप फोर्स करत होता. तो व्यक्ती इतर देखील सेलिब्रिटीच्या मुलांना पार्टी मध्ये येण्यासाठी फोर्स करत होता. यांचा असा तर प्लॅन नव्हता ना की मंत्र्यांना बोलवून त्यांना आशा प्रकरणात त्यांना अडकवायचं?

9. मी एनसीबीच्या डीजी साहेबांना विचारणार आहे की त्यांनी एक स्टेटमेंट 2 तारखेला दिल होत की पहिल्यांदा समुद्रात कारवाई करण्यात आली होती. परंतु त्यांच्या माहितीसाठी सांगतो कारवाई समुद्रात झाली नाही. अगोदरच कारवाई केली होती. ज्या केस मध्ये चार्जशीट झाली आहे त्या केसची चौकशी हे काय करणार आहेत. एक तर त्यांना सत्य समोर आणायचं आहे नाही तर त्यांना मला घाबरवायचं आहे. मी त्यांना सांगतो मी घाबरणारा नाही.

10. मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढत आहे. ड्रग्जच्या नावावर जी हजारो कोटी रुपयांची जी वसुली होत आहे त्यांच्या विरोधात मी लढत आहे. माझ्या जावयाने म्हटलं आहे की जर हे अशाप्रकारे चुकीच्या कारवाया करत असतील तर ही लढाई अशीच सुरू ठेवा. जर मला 20 वर्षे तुरुंगात राहावं लागलं तरी हरकत नाही, मात्र यांना सोडू नका.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो

व्हिडीओ

Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos Viral: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
Embed widget