एक्स्प्लोर
नवी मुंबईत शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले, आमदार संदीप नाईकांची 'रेंज रोव्हर' फोडली
ऐरोलीत महापालिकेचं सभागृह बांधण्यात आलं. त्या सभागृहाच्या उद्घाटनचा कार्यक्रम आज होता. या उद्घाटनाचं श्रेय घेण्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले.
नवी मुंबई : नवी मुंबईत एका कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या राड्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांच्या रेंज रोव्हर कारची तोडफोड केली.
ऐरोलीत महापालिकेचं सभागृह बांधण्यात आलं. त्या सभागृहाच्या उद्घाटनचा कार्यक्रम आज होता. या उद्घाटनाचं श्रेय घेण्यावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. त्यात संदीप नाईक यांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली.
दरम्यान, या हाणामारीमुळे शहरात तणावाचा वातावरण आहे. संदीप नाईक यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, दिघा, घणसोली बंद करण्यास सुरुवात केली आहे.
माजी मंत्री गणेश नाईक नाईक यांचे पुत्र, संदीप नाईक हे ऐरोलीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement