एक्स्प्लोर

नवी मुंबई महापालिकेचं घरोघरी भाजीपाला पोहोचवण्यासाठी अॅप, मार्केटमधील गर्दीही संपली 

नवी मुंबईकरांना घरोघरी भाजीपाला मिळावा यासाठी महापालिकेने एक अॅप तयार केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून सोसायटींनी भाजीपाला गाडीची मागणी केल्यास महापालिकेकडून आपल्या गाड्या संबंधीत सोसायटीमध्ये पाठवल्या जातात.

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजीपाला घेण्यासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. नवी मुंबईत मात्र असं चित्र पाहायला मिळत नाही. नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला अॅपमुळे नवी मुंबईकरांच्या दारात भाजीपाला पोहचत आहे. महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाला शहरवाशीय मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. सध्या महापालिकेकडे 1200 सोसायट्यांनी अॅपवर नोंदणी करत भाजीपाला गाड्यांची मागणी केली आहे.

शहरातील सर्व भागात महापालिकेकडून स्वस्त भाजीपाला गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. अॅपच्या माध्यमातून सोसायटींनी भाजीपाला गाडीची मागणी केल्यास महापालिका आपल्या गाड्या संबंधीत सोसायटीमध्ये पाठवतात. शेतकरी वर्गाकडून थेट घेतलेला भाजीपाला लोकांना आपल्या दारात स्वस्तात मिळत असल्याने त्यांना बाहेर पडायची गरज लागत नाही. सोसायटीमध्ये भाजीपाला महानगरपालिका उपलब्ध करून देत असल्याने मुख्य बाजारपेठेतील गर्दी नाहीशी झाली आहे. सोशल डिस्टन्स ठेवून रहिवाशी भाजीपाला घेत असल्याने कोणत्याही नियमाला हरताळ फासला जात नसल्याने कोरोना पसरण्याची शक्यता कमी झाली आहे.

भाजी बाजारातील गर्दीवर नियंत्रणासाठी मिळवणे अत्यंत महत्वाचे झाले होते. कारण कोरोनोचा संसर्ग पसरण्याची भीती भाजीपाला मार्केटमुळे निर्माण झाली होती.  त्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शेतकरी ते ग्राहक असे थेट नियोजन केले आहे. या योजनेंतर्गत शेतकरी, पुरवठादार आणि ग्राहक (खरेदीदार) यांच्यात समन्वय करत हा भाजीपाला पोहोचवण्यात येणार आहे. यासाठी वाहतूक व्यवस्था असलेली वाहने निर्जंतुकीकरण करूनच मालाचा पुरवठा केला जाणार आहे. मास्क, हॅण्डग्लोज आदी सुरक्षा सुविधाही दिल्या जाणार असून सोसायटीच्या दारात हा भाजीपाला विक्री केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून भाजीपाला विकण्याची इच्छा असेल त्यांनी पालिकेने नेमलेल्या संस्थेशी संपर्क साधल्यास त्यांच्या भाजीपाला थेट ना नफा ना तोटा तत्त्वावर ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. ग्राहकांना भाजीपाला खरेदी करताना 15 फुटांचे अंतर ठेवून खरेदी करावा लागणार आहे. यामध्ये टोकन पद्धत राबवली जाणार असून डिजिटल पेमेंट सुविधाही असणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विकायचा आहे. त्यांनी नवी मुंबई महापालिकेस संपर्क करावा. भाजीपाला खराब होवून फेकून देण्यापेक्षा त्याचे चार पैसे शेतकऱ्याला मिळतील आणि शहरातील ग्राहकांना थेट भाजीपाला मिळत असल्याने स्वस्तात उपलब्ध होईल. या उपक्रमामुळे सोशस डिस्टन्सिंग पाळली जाणार आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांच्या जनसंपर्क साखळीतून शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना राबवली जात आहे. यासाठी भाजी विक्रेते, महापालिका भाजी मंडई तसेच डी मार्ट, रिलायन्ससारख्या आस्थापनांनाही भाजीपाला देण्यात येणार असून त्यांच्यामार्फतही वितरण होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget