एक्स्प्लोर
नवी मुंबईतील क्लासच्या शिक्षकाचे विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 3 मध्ये दीपक कोचिंग क्लास आहे. या क्लासचा संचालक आणि शिक्षक दीपक शेंडगेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत एका कोचिंग क्लासच्या संचालकाने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दापोलीत पिकनिकला नेऊन आरोपीने अत्याचार केल्याचा दावा विद्यार्थ्याने केला आहे. नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 3 मध्ये दीपक कोचिंग क्लास आहे. या क्लासचा संचालक आणि शिक्षक दीपक शेंडगेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. दीपकने क्लासमधील मुलांना पिकनिकसाठी दापोलीला नेलं होतं. तेव्हा रात्री एका अल्पवयीन मुलावर त्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घरी आल्यावर मुलानं हा प्रकार आईवडिलांना सांगितला. पालकांनी दीपक शेंडगेविरोधात रबाळे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दीपकला अटक केली आहे.
आणखी वाचा























