एक्स्प्लोर
Advertisement
सुटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली
नेरुळमधील पाम बीचवर मंगळवारी सकाळी काळ्या सुटकेसमध्ये एका तरुणीचा शीर धडापासून वेगळं केलेला मृतदेह सापडला होता.
नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीच रोडवर सुटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. नेरुळमधील पाम बीचवर मंगळवारी सकाळी काळ्या सुटकेसमध्ये एका तरुणीचा शीर धडापासून वेगळं केलेला मृतदेह सापडला होता.
मरियम शेख (वय 24 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव असून ती ब्युटिशियन होती. ही तरुणी मूळची गोवंडीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये ती पूर्वी ज्या ठिकाणी काम करत होती, त्या मालकाचाही समावेश आहे.
मरियम शेख ही एका संशयिताच्या वाशीमधील ब्युटी पार्लरमध्ये काम करत होती. पण त्याच्यासोबत वाद झाल्याने तिने ते पार्लर सोडलं आणि सीवूड्समधील त्याच ब्युटी पार्लरच्या दुसऱ्या शाखेत काम करण्यास सुरुवात केली. याचाच राग मनात ठेवून आरोपीने तिची हत्या करुन बदला घेतला असावा, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्याने दिली.
नवी मुंबईत पाम बीच रोडवर सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला
क्राईम ब्रान्चचं एक पथक या प्रकारणाचा तपास करत असून मुख्य आरोपीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी करुन अधिक माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
करावे गावातील एका शेतकऱ्याने सकाळी 11.45 च्या सुमारास त्याच्या भाजीच्या शेतात एक बेवारस सुटकेस पाहिली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी बेपत्ता लोकांच्या तक्रारींची तपासणी केली असता संबंधित मृतदेह मरियम शेखचा असल्याची ओळख पटली.
मरियम रविवारी रात्री घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. "आम्ही रविवारी रात्रीपासून मरियमला कॉल करत होतो. रात्री 11 वाजता तिला शेवटचा कॉल होता. त्यानंतर तिचा फोन नॉटरिचेबल लागत होतो," असं मरियमच्या भावाने सांगितलं.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पाम बीच रोडवर मृतदेह सापडण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशी मागणी रहिवासी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement