एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नारायण राणे पुन्हा शिवसेनेत परतणार?

मुंबई : काँग्रेसच्या सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची शक्यता सध्या राजकीय वर्तुळात आहे. नारायण राणे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना सध्या ऊत आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीच्या सरचिटणीसपदावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी राजीनामा देणं, नितेश राणे यांचं नाव निलंबित आमदारांच्या यादीतून अचानक वगळलं जाणं, यामुळे राणेंची सत्ताधाऱ्यांशी जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून नारायण राणे पक्षाच्या धोरणांवर उघडपणे टीका करत होते. शिवाय मुंबई महापालिकेच्या निमित्ताने स्थानिक नेत्यांशी त्यांचे खटकेही उडाले होते. तसंच जिल्हा परिषद निवडणुकीतही नारायण राणेंना काँग्रेसची साथ मिळाली नसल्याचं दिसलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर नारायण राणे नाराज आहेत. पण आता ही नाराजी पक्षांतरापर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे. चर्चेच्या आधीच सांगतो की मी निर्णय घेतोय : राणे दरम्यान सोशल मीडियावर नारायण राणे पक्ष बदलणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. याविषयी राणेंना बुधवारी विचारलं असता ते म्हणाले की, "शिवसेना किंवा भाजपचे कोणतेही नेते मला भेटले नाहीत किंवा माझ्याशी बोलले नाहीत. मी काँग्रेसमध्येच आहे. काही निर्णय घ्यायचा असेल तर चर्चेच्या आधीच मी सांगतो की निर्णय घेतोय. अस्वस्थ होऊन सांगणार कोणाला? याआधी काँग्रेसविषयी बोलताना 'माझा कट्टा'वर बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, "अस्वस्थ होऊन सांगणार कोणाला? काही वेळा सहन करावं लागतं, मार्गा काढावे लागतात. योग्य दिसत नाही ते बोलतो. काँग्रेसमध्ये आलो तर काँग्रेसचं कल्चर आत्मसात करावं लागेलच." भाजपमध्ये जायचं असेल तर लपवेन कशाला? तसंच भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिलं होतं. "विधानसभेच्यावेळी फॉर्म भरु नका, दिल्लीत येऊन शपथ घ्या, असं भाजपतर्फे सांगण्यात आलं होतं. परंतु ते शक्य नाही. राजकारणात असं होत नाही. अनेकांनी विचारलं असलं तरी मला भाजप जायचंय असं कधीही बोललो नाही. मला जायचं असेल तर सांगनेच, लपवेन कशाला? मी कोणाला घाबरत नाही," असं राणेंनी 'माझा कट्टा'वर सांगितलं होतं. नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास - 1968 - वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश - 1968 - शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी - 1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले - 1990-95 - नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर - 1991 - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले - 1990-95 - याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद - 1996-99 - युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान - 1999 - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड - 2005 - शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली - 2005 - शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश -2005 - शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी - 2005 - आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड - 2007 - काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड - 2009 - विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण - 2014 - लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा - 2014 - मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाहीSanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहितीABP Majha Headlines :  11 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
Embed widget