Narayan Rane : रमेश लटके आज असते तर शिंदे गटात असते - नारायण राणे
Narayan Rane on Ramesh Latke : पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी ते म्हणले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काही राहिले नाही. राज्य गेलं, मुंबई गेली.
Narayan Rane on Ramesh Latke : दिवगंत रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं आहे. ते मुंबई पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. अंधेरी पोटनिवडणुकीत नारायण राणे यांची जाहीर सभा होणार असल्याचे यावेळी आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.
पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी ते म्हणले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे आता काही राहिले नाही. राज्य गेलं, मुंबई गेली. दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार असणार आहे. मुंबईत एकही खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.
बनावट शपथपत्राची चौकशी सुरु आहे. दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. लवकरच वास्तव समोर येईल, असे नारायण राणे म्हणाले. सकाळी बाबुलनाथचं दर्शन घेऊन मी प्रचाराला सुरवात केली आहे. मी एकाच सांगतो दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई माझ्याकडे आहे. मी तिकडेही जाऊन आलो आणि इकडे मुंबईतही प्रचार सुरु आहे. मी दोन्ही मतदार संघ निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
मुंबईमधील अंधोरीच्या पोट निवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला आहे. त्यांचा विजय नक्की होईल. आम्ही नक्कीच जिंकूया, असा विश्वासही यावेळी नारायण राणे यांनी व्यक्त केला.
हिंमत असेल तर सरकार पडून दाखवा, असे म्हणत होते. अखेर आम्ही दाखवलं ना सरकार पाडून. उद्धव ठाकरेंनी आता बडबड करणं बंद करावी, असे नारायण राणे म्हणाले. आदित्य ठाकरेंवर मला प्रश्न विचारु नका, असेही राणे म्हणाले.