नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव द्या, प्रकाश आंबेडकरांची मागणी तर शिवसेना म्हणतेय...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात असताना बाळासाहेबांऐवजी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
मुंबई : दि बा पाटील (Di Ba Patil) यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport)देण्यात यावे यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कळवा नाका आणि कळवा नाका इथपासून ते नवी मुंबईपर्यंत आज गुरुवारी साखळी आंदोलन करण्यात आलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात असताना बाळासाहेबांऐवजी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. या विमानतळासाठी रायगड जिल्ह्यातील उलवे, कोपर, पनवेल या पट्ट्यातील मूळ रहिवासी व भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी जमिन दिली आहे. या बांधवांनी इथलेच भूमिपुत्र असलेल्या दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे. नवी मुंबईच्या इतिहासात दि.बा. पाटील यांचे बहुमोल असे योगदान राहिले आहे, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिली त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला त्याचे नेतृत्व दिबांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखिल दिबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेल चे नगराध्यक्षपद भूषविलेल्या दि. बा. नि लोकसभेत त्यांनी चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांची समाज भूषण दिबांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळा साठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोक नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
Navi Mumbai Airport Name : नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटलांचं नाव द्या, मागणीसाठी मानवी साखळी!
काय म्हणाले शिवसेनेचे नेते
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Navi Mumbai Airport) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)यांचं नाव देण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. आज दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी झालेल्या आंदोलनासंदर्भात बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलेलं आहे. आम्ही कोणतं नाव बदलून दिलेलं नाही. या नावाला कोणाचा विरोध असायची गरज नाही. दि बा पाटील हे थोर नेते होते. त्यांचं नाव इतर प्रकल्पाला दिलं . यामागे राजकारण आहे. सर्वांना माहीत आहे यामागे कोणता पक्ष आहे, असं शिंदे म्हणाले तर खासदार संजय राऊत म्हणाले की, नवी मुंबई विमान तळाला बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. दि बा पाटील हे देखील लढवय्ये नेते होते. त्यांच्या स्मरणार्थ देखील स्मारकाचा विचार व्हावा, असं राऊत म्हणाले.
सात वर्षांत भाजपला मिळालेलं यश हे मोदींच्या चेहऱ्यामुळेच, हे नाकारु शकत नाही : Sanjay Raut
विमानतळाच्या नामकरणावरून राजकीय वाद
गेल्या काही महिन्यांपासून नवीमुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून स्थानिक सर्वपक्षीय कृती समिती प्रकल्पग्रस्त विरुद्ध राज्य सरकार असा वाद सुरू आहे. नवी मुंबईचे निर्माण हे स्थानिक आगरी- कोळी- कराडी प्रकल्पग्रतांच्या जमिनीवर करण्यात आले आहे. याच जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असून या विमानतळाच्या नामकरणावरून राजकीय वाद सुरू झाले आहेत. त्यातच, नवी मुंबईची प्लॅनिंग ऑथोरिटी असलेल्या सिडकोने नुकताच या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव केला आहे. तर, राज्यशासन देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही असल्याने स्थानिक भूमीपुत्रांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर, स्थानिक भूमीपुत्रांनी एकत्रित येत प्रकल्पग्रस्तांचे नेते आणि सिडको आंदोलनातून संपूर्ण देशाला न्याय देणाऱ्या दि. बा. पाटील यांच्या नावाची आग्रही मागणी करण्यात येत आहे.
























