Nallasopara Boy death : हृदयद्रावक! लपाछपीचा खेळ खेळताना चिमुरडा झाला बेपत्ता; चार दिवसांनी पाण्याच्या टाकीतून वास आला अन्...
Nallasopara Accident News : मिञांसोबत लपाछपी खेळताना तो पाण्याच्या टाकीत पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांसमोर आली आहे. माञ नालासोपारा पोलीस विविध अंगानी याचा तपास करत आहे.

नालासोपारा : लपाछपीचा खेळ एका लहानग्याच्या जीवावर बेतला आहे. नालासोपाऱ्यातील पूर्वेकडील टाकी पाडा परिसरात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय मेहराज शेख या मुलाचा मृतदेह सोमवारी सकाळी इमारतीच्या पाण्याच्या टाकीत (Nallasopara Accident News) आढळून आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिञांसोबत लपाछपी खेळताना तो पाण्याच्या (Nallasopara Accident News) टाकीत पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांसमोर आली आहे. माञ नालासोपारा पोलीस विविध अंगानी याचा तपास करत आहे. (Nallasopara Accident News)
Nallasopara Accident News : पाण्याच्या टाकीत वास येऊ लागल्याने शोध घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, मेहराज शेख चार दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांसोबतच नागरिकांनीही परिसरात मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली होती, परंतु मुलाचा काहीही ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर ४ डिसेंबरला मेहराज मिसिंगच्या अपहरणाचा गुन्हा मेहराजच्या आईच्या तक्रारीवरुन नालासोपारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. शोधमोहीम सुरु असतानाच सोमवारी सकाळी इमारतीच्या वरच्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत वास येऊ लागल्याने शोध घेतला असता, त्या टाकीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
Nallasopara Accident News : तो टाकीजवळ कसा पोहोचला
पोलिसांनी मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे. परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासणे, मुलगा टाकीजवळ कसा पोहोचला, कोणाचा यामागे काही हात आहे का, पाण्याची टाकी उघडी असल्यास त्यात बांधकाम व्यावसायिकाचा हलगर्जीपणा आहे का? याचे सर्वकष तपासाचे काम वेगाने सुरू आहे. माञ तो मिञांसोबत लपाछपी खेळत असताना पाण्याच्या टाकीत पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Nallasopara Accident News : लपाछपी खेळत असताना मेहराज चुकून इमारतीच्या परिसरात गेला
या घटनेच्या चौकशीदरम्यान मेहराजसोबत लपाछपी खेळणाऱ्या त्याच्या काही मित्रांनी महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली आहे. मुलं लपाछपी खेळत असताना मेहराज चुकून इमारतीच्या परिसरात गेला आणि पाण्याच्या टाकीजवळ लपण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल जाऊन तो आत पडल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या मुलांनी भीतीपोटी तत्काळ ही माहिती कोणालाही न सांगितल्याचेही समोर आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे दिसत असले तरी सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.























