एक्स्प्लोर

जेसीबीने खड्डा खांदताना गॅस पाईप फुटला; हॉटेलमध्ये उडाला आगीचा भडका, 4 जखमी

नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील मुख्य रस्त्यावर पालिकेच आर.सी.सी. गटाराचं काम सुरु आहे.

नालासोपारा : गॅसचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना झाल्याच्या घटना वारंवार वाचण्यात किंवा पाहण्यात येत असतात. गेल्याच आठवड्यात बिहारमधील एका हॉटेलमध्येही गॅसचा स्फोट होऊन भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर, आता नालासोपारा (Nalasopara) येथील हॉटेलमध्येही अशीच दुर्घटना घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथे पालिकेच्या गटाराच्या कामात गॅस लाईन तुटल्याने जोरदार स्फोट होवून येथील एक हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी गेलं आहे. या भीषण दुर्घटनेत हॉटेलमधील चार कर्मचारी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 

नालासोपारा पूर्वेकडील आचोळे रोड येथील मुख्य रस्त्यावर पालिकेच आर.सी.सी. गटाराचं काम सुरु आहे. त्याच अनुषंगाने काम सुरू असताना आज दुपारी साडे तीनच्या सुमारास जेसीबीच्या साहय्याने खड्डा खोदत असताना, ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तेथूनच गेलेली गॅस पाईपलाईन तुटली. त्यानंतर, गॅसने पेट घेतल्याने जवळच असलेलं हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी आलं. तर, शेजारीच असलेल्या एम.एस.ई.बी.च्या ट्रान्सफार्मरलाही आग लागल्याने काही वायरी रस्त्यावर पडल्या आहेत. त्यामुळे, खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांसाठी तात्काळ तेथील रस्ता बंद करण्यात आला आहे. 

या दुर्घटनेत हॉटेलमधील कर्मचारी सुंदर शेट्टी (वय ६२), गोपाळ बांगेरा (वय ७०), चंद्र मागकर (वय ४५), राजकुमार शाह (वय २७) जखमी झाले आहेत. यातील गोपाळ बांगेरा हा गंभीर जखमी असून अधिक प्रमाणात भाजला आहे. सध्या चौघांवरही नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या हॉटलच्या पहिल्या आणि दुस-या मजल्यावरील घरांचेही नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, या आगीच्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आले आहेत. त्यामध्ये, गॅसची पाईपलाईन फुटल्याने आगीचा भीषण स्फोट होत असल्याचे दिसून येते. तसेच, आगीचा स्फोट झाल्यानंतर हॉटेलमध्ये मोठा भडका उडाल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha  Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 11 NOV 2024Amit Shah : सांगलीतल्या सभेत अमित शाहांचं सूचक वक्तव्य, 2 दिवसांत शाहांना सूर का बदलावे लागले?Shivani Vijay Wadettiwar  : वीज गेल्यामुळे काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवारांची भर सभेत शिवीगाळSudhakar Kohale Nagpur :  काँग्रेसच्या आरोपाला भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Vidhan Sabha Elections 2024: काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला, 28 नेत्यांना दणका
काँग्रेसकडून मोठी कारवाई, आबा बागुलांसह 7 बंडखोरांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
मुंबईत कोण बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाला? IANS- MATRIZE च्या ओपिनियन पोलची आकडेवारी समोर 
Embed widget