एक्स्प्लोर
संगीतकार खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार
दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल खय्याम यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमात खय्याम यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खय्याम साहेब हे 92 वर्षाचे युवक आहेत. त्यांचा सन्मान माझ्या हातून होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मुंबई: बॉलिवूडमधील महान संगीतकार खय्याम यांना मानाचा हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल खय्याम यांना सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हृदयनाथ मंगेशकर यांच्या 81 जन्मदिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान केला गेला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पंडित हरिप्रसाद चौरसिया, हृदयनाथ मंगेशकर आणि खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर देखील उपस्थित होत्या.
कार्यक्रमात खय्याम यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खय्याम साहेब हे 92 वर्षाचे युवक आहेत. त्यांचा सन्मान माझ्या हातून होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मंगेशकर कुटुंब देशाला मिळालेली देणगी आहे. यांचा आलेख नेहमी वरच राहिला आणि लोकांच्या मनात नेहमी सर्वोच्च स्थान टिकवले.हिमालयाच्या नावाने हिमालयाला पुरस्कार दिला, अशा शब्दात त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यांच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. त्यांच्या गाण्यातील, संगीतातील गोडवा अमीट असा आहे. त्यांच्या गाण्यातून आपल्याला स्वर्गात असल्याचा अनुभव मिळतो, असे फडणवीस म्हणाले.
हृदयनाथ मंगेशकर एक मोठे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावाचा सन्मान मला मिळणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मंगेशकर परिवाराने संगीत क्षेत्रासाठी फार महत्वाचे काम केले आहे, असे सत्काराला उत्तर देताना खय्याम यांनी म्हटले तर माझ्या नावाचा पुरस्कार खय्याम यांना दिला हा माझा पुरस्कार आहे. त्यांचे प्रत्येक गाणे मला पाठ आहे. खय्यामजी माझ्यासाठी आदर्श आहेत, असे हृदयनाथ मंगेश यावेळी म्हणाले.
सिनेक्षेत्रातील मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार यापूर्वी लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, जावेद अख्तर, ए आर रहमान, विश्वनाथ आनंद आणि पंडित जसराज यांना प्रदान करण्यात आला आहे.
खय्याम यांचा अल्पपरिचय
पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले. अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले.
पद्मभूषण खय्याम यांनी उमराव जान, त्रिशूल, थोडीसी बेवफाई, नूरी, बाजार, हीर रांझासह अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. 'इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है, कभी कभी मेरे दिल में, जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने, दिखाई दिए यूँ, दिल चीज क्या है, परबतों के पेडोंपर श्यामका बसेरा, मै पल दो पल का शायर हूँ, ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है, हैं कली कली के लब पर,' अशी त्यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बॉलीवूड
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement