एक्स्प्लोर
योगींच्या सभेचं बॅनर काढलं म्हणून भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी
तुळिंज पोलिस ठाण्यात या मारहाणीबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
![योगींच्या सभेचं बॅनर काढलं म्हणून भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी Municipal officer beaten by BJP workers in Nalasopara योगींच्या सभेचं बॅनर काढलं म्हणून भाजप कार्यकर्त्यांची गुंडगिरी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/23195214/BJP-MARHAN.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नालासोपारा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचं बॅनर काढलं म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केल्याचे समोर आले आहे. पालिका अधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विरारमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा भाजपने आयोजित केली आहे. त्यासाठी नालासोपाऱ्यात भाजपने सभेचे बॅनर लावले होते. विशेष म्हणजे, या बॅनरसाठी भाजपने परवानगी घेतली नव्हती.
या अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई करत, वसई विरार महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हे बॅनर काढले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी अनधिकृत बॅनर काढणाऱ्या पालिका अधिकारी गोकुळ पाटील यांना भररस्त्याच मारहाण केली.
तुळिंज पोलिस ठाण्यात या मारहाणीबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)