![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
मुंबईकर मुलीनं रचला इतिहास, दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखरावर चढाई
मुंबईकर काम्या कार्तिकेयन या 12 वर्षीय मुलीने सर्वात कमी वयात दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंचं शिखरावर चढाई करण्याचा विक्रम केला आहे.
![मुंबईकर मुलीनं रचला इतिहास, दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखरावर चढाई mumbaikar girl set record, kamya kartikeyan set new record in mountain climbing मुंबईकर मुलीनं रचला इतिहास, दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखरावर चढाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/10224626/Kamya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईकर मुलगी काम्या कार्तिकेयन हिने दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंचं शिखर सर करत इतिहास रचला आहे. काम्या अवघ्या 12 वर्षाची आहे, त्यामुळे तिच्या पराक्रमाचं जास्त कौतुक होतंय. दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामधील सर्वात उंच शिखर माउंट अंकोकागुआ सर करणारी काम्या सर्वात कमी वयाची गिर्यारोहक आहे. काम्याने माउंट अंकोकागुआच्या टोकावर पोहोचल्यानंतर देशाचा अभिमान असलेला तिरंगाही फडकावला.
काम्या कार्तिकेयन मुंबईतील नेवी चिड्रन स्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. काम्याने 1 फेब्रुवारी 2020 रोजी माउंट अंकोकागुआ हे 6960 मीटर उंचीचं शिखर करुन हा इतिहास रचला आहे. काम्याचे वडील एस कातिकेयन भारतीय नौसेनेत कमांडर आहेत आणि आई लावण्या कार्तिकेयन शिक्षिका आहेत. काम्याला लहानपणापासूनच गिर्यारोहन, ट्रेकिंगची आवड आहे. तिची हीच आवड तिच्या पालकांची जोपासली आणि तिला आणखी प्रोत्साहन दिलं. काम्याने 9 वर्षाची असताना उत्तराखंडमधील अनेक शिखर सर केली होती.
काम्या गिर्यारोहन आणि ट्रेकिंगसाठी लहानपणापासूनच वडिलांसोबत फिटनेसचं प्रशिक्षण घेत आहे. डोंगर चढाई करताना फिटनेसची आवश्यकता असते, ते जपण्यासाठी लहानपणापासूनच ती शारीरिक आणि मानसिक तयारी करत आलीय. काम्याने अॅडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होत असते. काम्याचे वडील कमांडर एस. कार्तिकेयन यांच्याबरोबर लहानपणापासूनच फिटनेस प्रशिक्षण घेत आहे.
काम्याने तीन वर्षाची असताना लोणावळा परिसरात सह्याद्रीच्या डोंगरांवर प्राथमिक ट्रेकिंग केलं होतं. नवव्या वर्षी काम्याने रुपकुंड पर्वतासह हिमालयातील अनेक शिखरे सर केली. नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई केली, तर लडाखमधील स्टोक कांगडी शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)