Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा जोर ओसरला, मात्र हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा कायम
Mumbai Weather Forecast : मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Mumbai Weather Update : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात दुपारपर्यंत अधूनमधून मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या. मुंबईसह उपनगरात आज पावसाचा जोर ओसरला असला, तरी संततधार कायम आहे. मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज दिवसभरात शहरात जोरदार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पावसाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मात्र, मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईत पावसाचा जोर ओसरला
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठ्यात वाढ झाली आहे. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील एकूण पाणीसाठा शुक्रवारी सकाळीपर्यंत 68 टक्क्यांवर पोहोचला आहे. या सात तलावांपैकी चार तलाव आतापर्यंत ओव्हरफ्लो झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे मुंबईत कुठेही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची नोंद नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हवामान खात्याचा इशारा कायम
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु, चेंबूर ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक सुरळीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन-पनवेल महामार्गावर सकाळी वाहतूक कोंडी झाली होती, पण आता वाहतूक पूर्ववत सुरु आहे. शहरात कुठेही पाणी साचलेलं नाही. शहराच्या बहुतेक भागांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसासह हलका पाऊस सुरु असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबईला पावसाचा यलो अलर्ट
आयएमडीने मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, शहर आणि उपनगरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून वेगळ्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अधूनमधून 40-50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. मुंबई शहर आणि पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत अनुक्रमे सरासरी 100.82 मिमी, 94.79 मिमी आणि 129.12 मिमी पाऊस पडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अफवांवर विश्वास ठेवू नका, पालिका प्रशासनाचं आवाहन
दरम्यान, शुक्रवारी सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच सर्व महाविद्यालये खुली ठेवण्यात आली आहे. दरम्यान, 28 जुलै रोजी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मात्र, पावसाचा यलो अलर्ट असल्याने शुक्रवारी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलेली नाही, असं पालिका प्रशासनानं म्हटलं आहे आणि लोकांनी यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे.