Mumbai Weather Alert : मुंबईत समुद्र खवळला; चौपाट्यांवर जाण्यास मनाई, 'या' सहा चौपाट्यांवर मोठा बंदोबस्त तैनात
मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाट्या बंद करण्यात आल्या आहेत.
Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone Update) परिणाम मुंबईतही जाणवतोय. मुंबईचा समुद्र खवळला आहे. 10 वाजून 21 मिनिटांनी समुद्राला भरती आली आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहे. खबरदारी म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या आणि sea-face बंद करण्यात आले आहेत. चौपाटींवर येणाऱ्या लोकांना पोलिसांकडून बाहेर जाण्याचा आवाहन केलं जात आहे. शिवाय जीवरक्षक ही चौपाट्यांवर खबरदारीचा उपाय म्हणून तैनात आहेत
बिपरजॉय चक्रीवादळ आज सध्याकाळी उशिरा गुजरातवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ सध्या किनाऱ्यापासून 180 किमी अंतरावर आहे. 5 ते 6 किलोमीटर प्रति तास वेगानं ते गुजरातकडे सरकतंय. बिपरजॉय आता समुद्रात ज्या ठिकाणी आहे, तिथं वाऱ्याचा वेग ताशी 120 किमी एवढा आहे. मुंबईत समुद्रकिनारी आणि चौपाट्यांवर नागरिक मोठ्या प्रमाणात जात असतात. त्यांनी पोहण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने समुद्रात शिरु नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खबरदारी करण्यात आली आहे. तरी देखील काही नागरिक समुद्रात जातात व प्रसंगी बुडण्याच्या काही घटना घडतात.
मुंबईत सहा चौपाटी बंद
गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटीच्या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान 60 प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तर दुपारी 3 ते रात्री 11 वाजेदरम्यान ६० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक काम करणार आहे. मुंबईला सुमारे 145 किलोमीटर लांबीचा अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. गिरगाव आणि दादर चौपाटी शहर विभागामध्ये तर जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी पश्चिम उपनगरात आहेत. नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, यासाठी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक आवाहन करणार आहे
गुजरातमध्ये NDRFच्या 18 तुकड्या तैनात
गुजरातमध्ये लँडफॉल झाल्यावर ताशी 120 ते 145 किमी इतक्या भयंकर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून तब्बल 74 हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हवलण्यात आलं आहे. गुजरातमध्ये NDRFच्या 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लष्कर, नौदल आणि वायुदलाची देखील मदत घेण्यात आली आहे.
सुरक्षा रक्षक तैनात
काही दिवसांपूर्वी वर्सोवा, सांताक्रुझ (पूर्व) येथे पोहायला गेलेल्या आठ लहान मुलांपैकी चार मुलं बुडाली होती. अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी सहाही समुद्र चौपाट्यांवर पूर बचावाचे प्रशिक्षण घेतलेले शहर आपत्ती प्रतिसाद पथकातील सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
हे ही वाचा :