मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद!
Mumbai News: ज्या भागातील पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात आला आहे, तेथील नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीनं वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.
Water Cut in Mumbai : मुंबईकरांसाठी (Mumbai News) मोठी बातमी. मुंबईकरांना (Mumbai Water Cut) पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) करण्यात आलं आहे. के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील (आऊटलेट) झडपा (वॉल्व्ह) बदलण्याच्या कामामुळे 19 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून शुक्रवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी काटकसरीने वापरावे व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-2 येथे 750 मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वेसावे (वर्सोवा) निगमवाहिनीवरील (आऊटलेट) चार झडपा (वॉल्व्ह) बदलण्यात येणार आहेत. 19 सप्टेंबर रात्री 8 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 सप्टेंबर दुपारी 2 वाजेदरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे, या कालावधीदरम्यान के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
के पूर्व - महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला मार्ग, एमएमआरडीए वसाहत, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी क्रमांक ३, शेर ए पंजाब, बिंद्रा संकूल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ – पहाटे 4.30 ते सकाळी 7.50 वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
के पूर्व - सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे 5 ते सकाळी 8 वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
के पूर्व - त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाऊंड, सारीपूत नगर (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी 8 ते सकाळी 10 वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
के पूर्व – दुर्गानगर, मातोश्री क्लब (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी 10 ते दुपारी 12 वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
के पश्चिम- सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्केट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ - सकाळी 7.30 ते दुपारी 12 वा.) पाणीपुरवठा बंद राहील.
संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. आऊटलेट दुरुस्ती कामानंतर नियमित वेळेनुसार पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून 4 ते 5 दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.