एक्स्प्लोर

Mumbai University Exam : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेस उद्यापासून सुरुवात

मुंबई विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस उद्यापासून ( 6मे पासून ) ऑनलाईन पद्धतीने सुरुवात  होत आहे. ही परीक्षा 21 मे पर्यंत चालणार आहे.  

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या 2020-21 या शैक्षणिक वर्षाच्या कला, वाणिज्य व विज्ञान  विद्याशाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या परीक्षेस उद्यापासून ( 6मे पासून ) ऑनलाईन पद्धतीने सुरुवात  होत आहे. ही परीक्षा 21 मे पर्यंत चालणार आहे.  ही परीक्षा 450 पेक्षा जास्त महाविद्यालये घेत असून पदवीच्या अंतिम वर्षाचे दीड लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हि परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सर्व महाविद्यालये सज्ज झाली आहेत.

मुंबई विद्यापीठाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या  शैक्षणिक वर्षातील परीक्षेचे नियोजन व्यवस्थित केल्यामुळे हिवाळी सत्राच्या अंतिम वर्ष सत्र 5 च्या परीक्षा डिसेंबर - जानेवारी दरम्यान घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान जाहीर झाला. यामुळे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या परीक्षा मे 2021 मध्ये  घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार या परीक्षा होत आहेत. या परीक्षा महाविद्यालये स्वतंत्रपणे त्यांच्या वेळापत्रकानुसार 6 ते 21 मे 2021 दरम्यान घेणार आहेत.

अंतिम वर्षाच्या एकूण 45 परीक्षा होणार-
पदवीच्या अंतिम वर्षाच्या सत्र 6 च्या बीए, बीकॉम, बीएस्सी, बीएमएस, बीएमएम, बीकॉम अकाउंट अँड फायनान्स, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स, बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्युटर सायन्स, बीएस्सी आयटी, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज यासह मानव्य, वाणिज्य, विज्ञान व आंतरशाखीय विद्याशाखेच्या एकूण 45 परीक्षा उद्यापासून सुरु होत आहेत.

परीक्षेस अंतिम वर्षाचे 155155 विद्यार्थी

बीकॉम सत्र ६ या परीक्षेत सर्वाधिक म्हणजे  ६८,१०१, बीएमएसमध्ये १६,५०१, बीएमध्ये १४,५९२, बीएस्सी १०,७७०, बीकॉम अकाउंट अँड फायनान्समध्ये १०,२५१, बीएस्सी आयटीमध्ये ९७२० यासह बीएमएम, बीकॉम बँकिंग अँड इन्शुरन्स,बीकॉम फिनान्शियल मार्केट, बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी, बीएस्सी काम्प्युटर सायन्स, बीएस्सी हॉस्पिटॅलिटी स्टडीज व इतर विविध विद्याशाखेच्या अंतिम वर्षाच्या ४५ परीक्षेमध्ये १ लाख ५५ हजार १५५ विद्यार्थी परीक्षेमध्ये बसत आहेत.

94 समूह व 450 महाविद्यालये सज्ज
परीक्षेच्या आयोजनासाठी विद्यापीठाने सर्व विद्याशाखांच्या महाविद्यालयाचे  समूह  तयार केलेले  आहेत. प्रत्येक क्लस्टरमधील एका महाविद्यालयास लीड महाविद्यालय म्हणून ही जबाबदारी दिलेली आहे. अशा 94 लीड महाविद्यालयावर हि जबाबदारी सोपवली आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या या परीक्षा मुंबई विद्यापीठातील 94 समूह ( Cluster ) महाविद्यालयाद्वारे  ४५० पेक्षा जास्त महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. १५ एप्रिल ते ५ मे २०२१ दरम्यान प्रथम व द्वितीय वर्षाच्या सत्र २ ते ४ या नियमित ( Fresh ) व सत्र १ व ३ च्या पुनर्परीक्षार्थी ( Backlog ) च्या परीक्षा यशस्वीरीत्या महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाल्या.

या उन्हाळी सत्रामध्ये विद्यापीठ चार विद्याशाखेमधून ५०० पेक्षा जास्त परीक्षा घेत असून, त्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. या उन्हाळी सत्राच्या परीक्षेसाठी विद्यापीठाचा परीक्षा विभाग सज्ज झाला आहे. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या पक्षातील तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Embed widget