एक्स्प्लोर
मुंबई विद्यापीठाकडून अधिसभा निवडणुकीवर लाखोंचा खर्च
गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे दिनांक 27 मार्च 2018 रोजी माहिती मागितली होती की, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत सर्वप्रकारच्या झालेल्या निवडणूक खर्चाची माहिती देण्यात यावी. अनिल गलगली यांच्या अर्जाला तब्बल 9 महिन्यानंतर मुंबई विद्यापीठाने उत्तर देत माहिती दिली.
![मुंबई विद्यापीठाकडून अधिसभा निवडणुकीवर लाखोंचा खर्च Mumbai university Expenditure of lakhs rupees on senate elections मुंबई विद्यापीठाकडून अधिसभा निवडणुकीवर लाखोंचा खर्च](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/23121918/Mumbai-University.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत मुंबई विद्यापीठाने 7.44 लाख रुपये खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई विद्यापीठाने दिली आहे. यात सर्वाधिक 5.65 लाख रुपयांचा खर्च हा प्रवास आणि जाहिरातींवर करण्यात आला आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे दिनांक 27 मार्च 2018 रोजी माहिती मागितली होती की, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत सर्वप्रकारच्या झालेल्या निवडणूक खर्चाची माहिती देण्यात यावी. अनिल गलगली यांच्या अर्जाला तब्बल 9 महिन्यानंतर मुंबई विद्यापीठाने उत्तर देत माहिती दिली.
मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाचे उप कुलसचिव राजेंद्र आंबवडे यांनी अनिल गलगली यांना माहिती दिली आहे. यात मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर जाणाऱ्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या निवडणुकीत 7 लाख 44 हजार 499 रुपये खर्च झाले आहेत. या खर्चात सर्वाधिक खर्च हा प्रवास यावर झाला असून त्याची एकूण रक्कम 3 लाख 22 हजार 89 रुपये आहे तर त्यानंतर जाहिरातीवर 2 लाख 43 हजार 232 रुपये खर्च झाले आहे.
सॉफ्टवेअरसाठी 68 हजार 810 रुपये, टोनर रिफिलिंगसाठी 16 हजार 638 रुपये, डेकोरेशनसाठी 20 हजार 500 रुपये, ट्रेनिंग वोट काऊटिंगसाठी 3 हजार 330 रुपये तसेच 69 हजार 900 रुपये हे हॉस्पिटलिटीवर खर्च करण्यात आले आहे.
अनिल गलगली यांच्या मते अधिसभा निवडणूकीचा खर्च आणि त्याची संपूर्ण माहिती मुंबई विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. गलगली यांनी राज्यपाल विद्यासागर राव तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकर यांना पाठविलेल्या लेखी पत्रात तशी मागणी केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)