एक्स्प्लोर
मुंबईत गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना भरधाव ट्रकने उडवलं
मुंबई : मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका भरधाव ट्रकने पोलिसांच्या दोन मार्शलला चिरडलं आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बीट मार्शलला सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
गस्तीवर असलेले दोन्ही बीट मार्शल नाईट ड्यूटीच्या दरम्यान रात्री 3 च्या सुमारास वाकोला फ्लायओव्हरवरुन जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव ट्रकने दोघांना चिरडलं आणि पळ काढला.
वांद्रे पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेले बीट मार्शल कोणत्या पोलिस स्टेशनचे आहेत, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement