एक्स्प्लोर

मुंबईत ट्रकची पाच कारसह बाईकला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

जेव्हीएलआरवर सिग्नलला उभ्या असलेल्या पाच कारसह बाईकला वाळूच्या ट्रकने जोरदार धडक दिली. भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.

मुंबई : मुंबईतील जेव्हीएलआरवर ट्रकने पाच कार आणि बाईला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री झालेल्या अपघातात 30 वर्षीय युवकाला प्राण गमवावे लागले. आरोपी ट्रक ड्रायव्हर फरार असून पोलिसांनी क्लीनरला अटक केली आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील सीप्झच्या गेट नंबर 3 चा सिग्नल लाल होता. सर्व गाड्या सिग्नल सुटण्याची वाट पाहत होत्या. पंकज थोरात हा तरुण आपल्या बाईकवर सर्वात पुढे थांबला होता. त्याचवेळी एक वाळूचा ट्रक भरधाव वेगाने आला. उतारावर ब्रेक न लागल्यामुळे ट्रक सगळ्या गाड्यांना उडवत पुढे आला. आजूबाजूच्या 5 गाड्यांना हा ट्रक सोबत घेऊन पुढे गेला. यातील एक गाडी समोर उभ्या असणाऱ्या पंकजच्या अंगावर गेली आणि तो गाडी खाली दबला गेला. जवळपास 10 ते 15 मिनिटं पंकज गाडीखाली अडकला होता. ट्रकने दिलेली टक्कर इतकी भीषण होती, की दोन गाड्या जागेवरच फिरल्या होत्या. पादचाऱ्यांनी गाडी हटवून पंकजला जवळच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं, पण तोपर्यंत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सीप्झच्या गेट नंबर 3 समोर वारंवार अशाप्रकारचे अपघात होत असल्याची तक्रार केली जाते. फ्लायओव्हरवर असणाऱ्या उतारामुळे गाड्यांचे ब्रेक काही वेळेला लागत नसल्याचं म्हटलं जातं. स्पीडब्रेकर बसवण्याच्या स्थानिकांच्या मागणीवर काही उत्तर निघालेलं दिसत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget