एक्स्प्लोर
मुंबई मेरी 'जाम', वाहतूक कोंडीत जगात अव्वल, तर दिल्ली चौथ्या स्थानावर
मुंबईत होणारी वाहतूक कोंडी मुंबईकरांना नवीन नाही. पण मुंबईच्या याच वाहतूक कोंडीने आता जागतिक विक्रम केला आहे.

Getty Images)
मुंबई : मुंबईत होणारी वाहतूक कोंडी मुंबईकरांना नवीन नाही. पण मुंबईच्या याच वाहतूक कोंडीने आता जागतिक विक्रम केला आहे. कारण जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडीचे शहर म्हणून आता मुंबईची ओळख झाली आहे. टोमटोम ट्राफिक इंडेक्स 2018 च्या सर्व्हेतून हा निष्कर्ष समोर आला आहे. जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या 400 शहरांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला आहे. त्यामुळे या 400 शहरांत वाहतूक कोंडीच्या बाबतीत मुंबई अव्वल क्रमांकावर आहे.
टोमटोम ट्राफीक इंडेक्सने केलेल्या सर्वेक्षणात प्रामुख्याने वेगवेगळ्या शहरांमधील वाहतुकीचा वेग आणि वाहतूक कोंडीसंदर्भातील पाहणी करुन निरिक्षणे नोंदवली आहेत. सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादींमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर तर राजधानी दिल्ली चौथ्या स्थानावर आहे.
मुंबईकरांना कोणतेही अंतर पार करण्यासाठी एकूण वेळेपेक्षा 65 टक्के अधिक वेळ लागतो. तर दिल्लीत एकूण वेळेच्या 58 टक्के अधिक वेळ लागतो. सर्वात जास्त वाहतूक कोंडी असलेल्या शहरांमध्ये मुंबई पहिल्या स्थानावर आहेत. तर त्यानंतर अनुक्रमे बोगोटा, लीमा, नवी दिल्ली आणि मॉस्को या शहरांचा नंबर लागतो.
व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
