Mantralaya Bomb Threat : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल, तपास सुरु
Mantralaya Bomb Threat : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन आला असून सध्या मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं असून तपास सुरु आहे.
Mantralaya Bomb Threat : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कथित बॉम्बचा तपास सुरु आहे.
साधारणतः तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचं त्या फोनवरुन सांगण्यात आलं होतं, अशी माहिती मिळत आहे. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचं पथक याठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. तसेच मोठा फौजफाटही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या आतल्या बाजूला पोलिसांसोबतच बॉम्बशोधक पथक कोणती संशयास्पद वस्तू आहे का याचा शोध घेत आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, साधारणतः तासाभरापूर्वी एक निनावी फोन आला होता. त्या फोनवर मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचं सांगण्यात आलं. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली आणि त्यानंतर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
साधारणतः तासाभरापूर्वी निनावी फोन आल्यानंतर मंत्रालयात सर्च ऑपरेशन सुरु झालं. सुदैवानं आज रविवार म्हणजेच, सुट्टीचा दिवस असल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, असं पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. गेल्या अर्धा पाऊण तासापासून धमकीचा फोन सुरु आहे. तसेच खरंच हा फोन कोणी केला? याचा शोधही मुंबई पोलीस आणि मंत्रालयातील कंट्रोल रुमकडून घेतला जात आहे.
पोलिसांच्या आणि बॉम्बशोधक पथकाच्या गाड्याही मंत्रालयासमोर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. तसेच बॉम्बशोधक पथकासोबतच श्वान पथकंही मंत्रालयात दाखल झाली आहेत. कोणती संशयित वस्तू मिळतेय का? याचा कसून तपास केला जात आहेत. एक निनावी फोन मंत्रालयातील कंट्रोल रूममध्ये आला आणि त्या फोनवरुन बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे ही माहिती खरी आहे का? याचा शोध सध्या पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकाकडून घेतला जात आहे.