![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
प्रतीक्षा नगर दुसरे जोशीमठ बनत आहे का ? अनेक इमारतींच्या आसपास जमिनीला भेगा
Mumbai pratiksha nagar joshimath : आपल्या सर्वांना उत्तराखंडमधील जोशी मठ येथे झालेली घटना आठवत असेलच. तसाच प्रकार मुंबईत देखील घडण्याची शक्यता आहे.
![प्रतीक्षा नगर दुसरे जोशीमठ बनत आहे का ? अनेक इमारतींच्या आसपास जमिनीला भेगा Mumbai soin pratiksha nagar joshimath bmc latest marathi news update प्रतीक्षा नगर दुसरे जोशीमठ बनत आहे का ? अनेक इमारतींच्या आसपास जमिनीला भेगा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/72367fc05cfa36964d8abfd4cbe104961675876469383129_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai pratiksha nagar joshimath : आपल्या सर्वांना उत्तराखंडमधील जोशी मठ येथे झालेली घटना आठवत असेलच. तसाच प्रकार मुंबईत देखील घडण्याची शक्यता आहे, असे सांगितले तर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. मुंबईतील प्रतीक्षा नगर येथील तब्बल वीस पेक्षा जास्त इमारतींच्या आसपासच्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्यातील रहिवासी अतिशय भीतीच्या वातावरणात जगत आहेत. उत्तराखंडमधील जोशी मठ सारखी परिस्थिती येथे होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
या परिसरामध्ये म्हाडाच्या वेगवेगळ्या लॉटरीसाठी इमारती बांधण्यात आल्या होत्या आणि त्यात गेल्या पंधरा पेक्षा जास्त वर्षांपासून सर्वसामान्य नागरिक राहत आहेत. पात्र आता या इमारतींना धोका निर्माण झाला आहे. या नागरिकांचा दावा तपासून पाहण्यासाठी आम्ही प्रतीक्षा नगर मधील जवळपास सर्वच इमारतींमध्ये स्वतः जाऊन पाहणी केली. आणि प्रत्येक बिल्डिंगच्या कंपाऊंड मध्ये जमिनीला मोठमोठ्या भेगा गेल्याचे तसेच जमीन खचत असल्याचे दिसून आले. त्यामुळे ही समस्या वाटते तितकी लहान नाही. याचे कारण पाणीपुरवठा विभागाची पाईपलाईन असल्याचे स्थानिक सांगतात.
प्रतीक्षा नगर मधील अनेक सोसायटीमधील रहिवाशांची चर्चा केली. त्या लोकांनी मुंबई महानगरपालिकेच्या एका प्रकल्पाला यासाठी दोषी धरले. हा प्रकल्प म्हणजे अमर महल ते वडाळा प्रतीक्षा नगर ते परळ इथपर्यंत जल बोगदा तयार करण्याचा प्रकल्प आहे. यासंदर्भात आम्ही म्हाडा प्रशासनाशी देखील संपर्क केला. म्हाडाचे कार्यकारी अभियंते आणि मुख्याधिकारी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्या पर्यंत रहिवाशांची तक्रार आली आहे. यासंदर्भात शिर्के बिल्डर्स, ज्यांनी या इमारती बांधल्या आहेत, त्यांना सखोल तपासणी करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेला देखील त्यांच्या सुरू असलेल्या कामामुळे असे झाले आहे का? यासंबंधी तपास करण्याची विनंती केली आहे.
प्रतीक्षा नगर हा भाग पूर्वी दलदल आणि खाडीचा भाग होता, त्यावर भर टाकून म्हाडाने इमारती उभ्या केल्या आहेत. या इमारतींना अजून तरी धोका नसला तरी आसपासची जमीनच जर खचत चालली असेल तर इमारतींना भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारे प्रतीक्षा नगर दुसरे जोशी मठ बनू नये यासाठी लवकरात लवकर उच्च स्तरीय चौकशी करून यावर उपाय शोधण्याची गरज आहे.
आणखी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)