Mumbai Slab collapse: मुसळधार पावसामुळे कांदिवलीत स्लॅब घरावर कोसळला, 35 वर्षीय तरूणाचा मृत्यू
Mumbai Slab Collapsed : मुंबईत सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अशोक नगर परिसरात बाथरूमचा स्लॅब धुला यांच्या घरावर कोसळला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मुंबई : हवामान विभागाने मुंबईला (Mumbai Alert) अलर्ट जारी केला आहे. पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलेय. संततधार पावसामुळे मुंबईत इमारत,झाड कोसळण्याच्याघटना घडल्या आहेत. मुंबईत सुरू असलेला मुसळधार पावसामुळे कांदिवली पूर्वेकडील अशोक नगर परिसरात स्लॅब घरावर कोसळून 35 वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
किशन धुला असं मृत व्यक्तीचं नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईत सुरू असलेला मुसळधार पावसामुळे अशोक नगर परिसरात बाथरूमचा स्लॅब धुला यांच्या घरावर कोसळला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाचे जवान आणि मुंबई पोलिसा घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनतर धुला यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालय मध्ये पाठवण्यात आला.समता नगर पोलिसा अधिक तपास करत आहेत.
धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
दरम्यान, मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मालाड परिसरात झाड पडल्याने एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबईतील मुसळधार पावसात झाड कोसळल्यामुळे आतापर्यंत तीन जणांचा जीव गेला आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळून एक व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कौशल महेंद्र जोशी वय वर्ष 38 असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात मणिभाई मुंजी चाळ येथे सुमारे 35 फूट उंच आणि चार फूट रुंदीचे एक पिंपळाचे झाड कोसळले. बुधवारी पहाटे कौशल दोषी, चाळीतील शौचालयात गेला असता हे झाड कोसळले. झाडाचा वजनदार भाग डोक्यावर पडल्यामुळे कौशल यांचा जागीच मृत्यू झाला.
वसईमध्ये इमारतीचा सज्जा कोसळला
वसईमध्येही इमारतीचा काही भाग कोसळला आहे. वसईमधील एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शनिवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून वसईमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने वसईच्या हत्तीमोहला परिसरातील एका जर्जर इमारतीचा सज्जा कोसळला आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. अद्याप पावसाळा म्हणावा तसा सुरू ही झाला नाही तरी जून महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसात एका इमारतीचा सज्जा कोसळल्याने जुन्या इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.