एक्स्प्लोर
रेल्वे पोलिसांच्या चतुराईने दादर स्टेशनवर मोबाईलचोर जेरबंद
मुंबई : मुंबईतील गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या शिताफीने मोबाईलचोराला जेरबंद करण्यात यश आलं आहे. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
27 तारखेच्या मध्यरात्री 12.30 वाजता वाजता आरपीएफचे कर्मचारी कुंतेश कुमार यांना दादर स्थानकावर एक संशयास्पद इसम आढळला. दादरच्या सात आणि आठ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर जिन्याखाली घुटमळणाऱ्या या व्यक्तीला आरपीएफने ताब्यात घेतलं.
25 वर्षीय आरोपी दादरच्या टिळक ब्रिजवरील फुटपाथवर राहत असून त्याचं नाव रवी सिंग उर्फ बादल आहे. त्याने सहा हजार रुपये किमतीचा राखाडी रंगाचा रेडमी MI-4A चोरल्याची कबुलीही दिली.
चेंबुरमधील प्रवाशाने मोबाईल हरवल्याची तक्रार पोलिसात दिल्यानंतर फोनची ओळख पटवण्यात आली आणि मोबाईल परत करण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement