एक्स्प्लोर

रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्याचं प्रसंगावधान, आजी-नातवाला लोकलखाली जाण्यापासून वाचवलं

रेल्वे पोलीस आणि बुकिंग क्लर्कची सतर्कता आणि चपळाईमुळे मुंबईतील करीरोड स्टेशनवर महिला आणि तिच्या नातवाचे प्राण वाचले.

मुंबई : मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील करीरोड रेल्वे स्थानकात एक वयस्कर महिला आणि तिच्या चार वर्षांच्या नातवाला रेल्वेखाली जाण्यापासून रेल्वेच्या एक कर्मचारी आणि लोहमार्ग पोलिसाने वाचवले. ही सर्व थरारक घटना या रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

करीरोड स्थानकात फलाट क्रमांक दोनवर 65 वर्षीय सुजाता चव्हाण त्यांच्या चार वर्षांच्या नातवाला घेऊन लोकलमधून उतरत होत्या. त्यांचा नातू लोकलमधून फलाटावर उतरला. मात्र सुजाता चव्हाण उतरत असतानाच लोकल ट्रेन सुरु झाली. यामुळे महिला आणि तिचा नातू लोकलच्या दारातच पडले.

दोघेही फलाटावरुन लोकलखाली जाणार एवढ्यात त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले लोहमार्ग पोलीस कैलास पठाडे आणि फलाटावरुन चालत जात असलेले रेल्वेचे बुकिंग क्लर्क उमानाथ मिश्रा यांनी चपळाई आणि प्रसंगावधान दाखवत त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांना लोकलखाली जाण्यापासून वाचवले. हा सर्व थरार फलाटवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांनी दोन वर्षात 34 प्रवाशांचे प्राण वाचवले मागील दोन वर्षांत रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 34 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आलं आहे. 2019 मध्ये 21 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलं. यामध्ये दादर स्थानकावर सात तर भायखळा, कुर्ला, कल्याण आणि कर्जत स्थानकांवर प्रत्येकी दोन जणांचे प्राण वाचवले आहेत. तसंच 2020 मध्ये पोलिसांनी 13 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. यापैकी सहा घटना या कल्याण रेल्वे स्थानकात घडल्या आहेत. लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या प्रवासादरम्यान या घटना घडल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Mumbai Local Train | रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्याने आजी-नातवाला वाचवलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget