Mumbai: रिक्षावर दीदींचे फोटो, पायात चप्पल न घालण्याची शपथ; लता मंगेशकरांच्या प्रकृतीसाठी मुंबईच्या रिक्षाचालकाची देवाकडं प्रार्थना
Lata Mangeshkar Health Update: भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात उपचार सुरू आहेत.
Lata Mangeshkar Health Update: भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात उपचार सुरू असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी देशाभरातून लोक प्रार्थना करत आहे. परंतु, लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी मुंबईतील एका रिक्षाचालकानं अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सत्यवान गीते असं त्या रिक्षाचालकाचं नाव आहे. सत्यवान हे मुंबईतील टिळक नगर परिसरातील रहिवाशी आहे. सत्यवान हे लता मंगेश यांच्या गाण्याचे चाहते आहेत. परंतु, लता मंगेशकर ज्या दिवसापासून रुग्णालयात दाखल झाल्यात आहेत. तेव्हापासून ते खूप दु:खी आहेत. त्यांनी त्याच्या रिक्षाच्या दोन्ही बाजूला लता मंगेश यांचा हसतमुख फोटो चिटकवले आहेत. त्यानं या फोटोखाली लता मंगेशकर लवकरात लवकर बरे व्हावेत, असं लिहलंय. त्यांनी लता मंगेशकर यांना बरे होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा सध्या चर्चेत आहेत.
एबीपी माझाशी बोलताना सत्यवान म्हणाले की, "मला जेव्हापासून त्यांच्या आजारपणाची बातमी मिळाली, तेव्हापासून मला जेवण जात नाही आणि कशातही माझं लागत नाही. मी माझ्या रिक्षावर लता दीदींचे फोटो लावून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करीत आहे. तसेच लता दीदींचे फोटो पाहून माझ्या रिक्षातून प्रवास करणारे प्रवासीही माझ्याप्रमाणेच लता दीदींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतील."
सत्यवान गीते यांनी लता मंगेशकर बरी होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ घेतली आहे. "मी देवाकडे त्याच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते करत आहे. त्या लवकरात लवकर बरा व्हाव्यात आणि त्यांच्या घरी परत यावे अशी माझी इच्छा आहे. तो पर्यंत मी चप्पल घालणार नाही."
सत्यवान गीते यांची रिक्षाही अगदी अनोखी आहे. पर्यावरण वाचवण्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी गेल्या 10 वर्षांपासून आपली रिक्षा विविध प्रकारची झाडे, पाने आणि गवताने सजवली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता सत्यवान गीते यांनी आपल्या रिक्षात पाण्याच्या छोट्या टाकीच्या सुविधेसह वॉश बेसिनही बसवलंय. यासोबतच त्यांनी आपल्या प्रवाशांसाठी हॅण्ड सॅनिटायझर आणि फर्स्ट एड बॉक्सचीही व्यवस्था केलीय.
हे देखील वाचा-
- Guess Who : बॉलिवूड नाही तर, हॉलिवूडवरही गाजवतेय राज्य! फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का?
- Priyanka Chopra's Baby : प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या घरी आली 'लहान परी', सरोगसीद्वारे दिला बाळाला जन्म
- Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha