एक्स्प्लोर

Mumbai Rain: गो अराउंड, गो अराउंड..., मुंबईत 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली, नेमकं काय घडलं?

Mumbai Rain: पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पावसामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतुकीसह आता विमानसेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Mumbai Rain मुंबई: मुंबईसह पश्चिम उपनगरात आज (18 ऑगस्ट) पहाटेपासून जोरदार पाऊस (Mumbai Rains) सुरू आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 48 तासांसाठी मुंबई आणि ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी (Mumbai Red Alert Rain News) करण्यात आला आहे. पावसामुळे मुंबईतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पावसामुळे रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतुकीसह आता विमानसेवेवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळे मुंबईत येणारी विमानं देखील हवेतच अडकली. मुंबई विमानतळावर लँड करणारे तब्बल 9 विमानांना गो अराउंड, गो अराउंडचा सिग्नल देण्यात आला. त्यामुळे 9 विमानं आकाशात चकरा मारत बसली होती. तर अहमदाबादकडून मुंबईकडे येणारं इंडिगोचं 6E6468 विमान मुसळधार पावसामुळे मुंबईऐवजी सूरतकडे वळवण्यात आले.

मुंबईतील लोकलसेवेवरही परिणाम-

मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकी सोबतच रेल्वे ट्रॅकवरतीसुद्धा पाणी साचायला सुरुवात झालीय. दादर स्थानकातील रेल्वे ट्रॅकवर ही मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलय. 15 ते 20 मिनिटे लोकल उशीराने धावत आहेत. पाऊस जर असाच सुरू राहिला तर रेल्वेही विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. तर मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर येथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल उशिराने धावत आहे. पावसाचा जोर वाढल्यास लोकल सेवेवर अधिक फरक पडू शकतो.  सध्या हार्बर मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे. 

मुंबईत रस्त्यांवर वाहनांच्या रांगा-

मुंबईतील पावसाचा आता रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. एखाद्या कार पार्किंगमध्ये ज्या पद्धतीने गाड्या उभ्या असतात, तसे पश्चिम द्रुतगती महामार्गावर गाड्यांच्या रांगा दिसत आहे. पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये देखील पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. तर दादर, माटूंगा, चेंबूर, वडाळा परिसरातील रस्ते देखील पाण्याखाली गेल्याने वाहने अडकून पडली आहेत.

मुंबईतील शाळेला सुटी-

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तर आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज, सोमवारी (18 ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

संबंधित बातमी:

Maharashtra Live Blog Updates: मुंबई, ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी, पुढील 48 तास महत्त्वाचे

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget