एक्स्प्लोर

मुंबईसह उपनगरांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला. पुढील काही तासांत या भागांत ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमधून पावसाने विश्रांती घेतली होती. अशातच आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सगळीकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूरमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे हवेत थोडा गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला.

6 ते 9 सप्टेंबर या काळात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राष्ट्रीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मुंबई, ठाण्यासोबतच नाशिक आणि जुन्नर परिसरातही मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड भागात रात्री मुसळधार पाऊस पडला. पुढील काही तासांत या भागांत ढगाच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेन वर्तविला आहे. कोकण किनारपट्टी काही भागात ही पावसाचा जोर राहील असा अंदाज आहे. पावसाचा जोर तळकोकणात वाढण्याची शक्यता असल्यानं समुद्रकिनाऱ्याजवळील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यभरात पावसाची दमदार हजेरी

रविवार रात्रीपासूनच राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे पुण्यात सिंहगड रोडवरील किरकट वाडी येथील 20 दुकानांमध्ये गुडगाभर पाणी भरलेलं पाहायला मिळालं. तर साताऱ्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला आहे. यवतमाळमध्येही काल संध्याकाळी आलेल्या पावसामुळे नेर तालुक्यातील उमरठा गावाला फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसलेल्या पावसमुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतातही पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. बुलढाण्यात काल संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याचंही पाहायला मिळालं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget